Pune Crime | पुण्यातील नायडू हॉस्पीटलमधील महिला डॉक्टरचा तलाठी पतीकडून खून

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तलाठी पतीने चारित्र्यावर संशय संशय घेऊन डॉक्टर असलेल्या पत्नीची चाकुने वार करुन, तसेच डोक्यात हातोडीने मारुन हत्या (Murder) केली आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील बोऱ्हाडेवाडी (Borhadewadi), मोशी येथे सोमवारी समोर आली आहे. सरला विजय साळवे (वय, 32), असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तसेच, विजयकुमार साळवे असं आरोपी पतीचे नाव (Pune Crime)आहे.

याबाबत माहिती अशी, भंडारा जिल्ह्यातील सरला आणि गोंदीया जिल्ह्यातील विजयकुमार यांचा 2019 साली प्रेमविवाह (Love marriage) झाला होता. सरला पुणे येथील नायडू हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. विजयकुमार हा जुन्नर तालुक्यातील आळेगावात तलाठी आहे.

दरम्यान, विजयकुमार साळवे (Vijaykumar Salve) याला पत्नी सरला साळवे (Sarla Salve) यांच्या
चारित्र्यावर संशय होता. घटनास्थळी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. ती मला साथ देत
नव्हती, त्यामुळे मला टोकाची भूमिका घ्यावी लागली. मला माफ करा, अशा आशयाचा मजकूर असलेली चिठ्ठी
पोलिसांना (Police) मिळाली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीवर सर्व पक्षीय सदस्यांचा बहिष्कार ! जाणून घ्या प्रकरण

ACB Police Inspector Transfer | अ‍ॅन्टी करप्शन विभागातील 34 अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या अन् नियुक्त्या

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Murder of a female doctor at Naidu Hospital in Pune by her husband Talathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update