Pune Crime | फुरसुंगी येथील रखवालदाराचा चोरीच्या उद्देशाने खून, गुन्हे शाखेकडून तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हडपसर परिसरातील फुरसुंगी मधील एका गोदामातील रखवालदाराचा खून (Murder) केल्याची घटना मंगळवारी (दि.15) घडली होती. या गुन्ह्यातील तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट पाचने (Crime Branch) अटक केली आहे. गोदामातील लोखंडी पाईप चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी खून (Pune Crime) केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

ध्रुवदेव राजेंद्र राय (वय 24), पंकजकुमार सिकंदर राय (वय- 22), अजयकुमार लखदेवप्रसाद यादव (वय 24, तिघे सध्या रा. धावडे वस्ती, भोसरी, मूळ रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. काशीनाथ कृष्णा महाजन Kashinath Krishna Mahajan (वय -55 रा. जळगाव) असे खून झालेल्या रखवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीतील अधिकारी शंकर बनकर Shankar Bunkar (वय 42, रा. फुरसुंगी, हडपसर) यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

मयत महाजन हे फुरसुंगी परिसरातील एका गोदामात रखवालदार म्हणून काम करत होते. या गोदामात लोखंडी पाइप ठेवण्यात आले होते. जळगाव येथील कंपनीत काम करणारा पंकजकुमार राय येथे माल घेऊन येत होता. त्यामुळे त्याला गोदामात मोठ्या प्रमाणात लोखंडी माल ठेवल्याची माहिती होती. गोदामाच्या परिसरात असलेल्या एका खोलीत मयत काशीनाथ महाजन हे राहत होते.

 

मंगळवारी (दि.15) मध्यरात्री आरोपी चोरी करण्यासाठी गोदामाच्या आवारात आले होते. आरोपींनी महाजन यांना बेदम मारहाण केली. आरोपींनी महाजन यांचा मोबाईल, एटीएम कार्ड, रोख रक्कम तसेच लोखंडी पाइप चोरून नेले. आरोपींच्या मारहाणीत महाजन हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिघांना भोसरी येथून अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil),
उपनिरीक्षक वैशाली गपाट (PSI Vaishali Gapat), प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले,
अकबर शेख, दया शेगर, राजस शेख आदींनी ही कारवाई केली.

 

Web Title :- Pune Crime | Murder of a janitor in Fursungi with intent to steal, three arrested by crime branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prakash Ambedkar | मुख्यमंत्री भेटून गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी साधला माध्यामांशी संवाद, म्हणाले…

Eknath Khadse | साधना महाजन तुमच्या कुटुंबातीलच आहेत ना? – एकनाथ खडसे

Urfi Javed | आंतरराष्ट्रीय ग्लॅमर वर्ल्डमध्ये चालली उर्फी जावेदची जादू, होतेय टेलर स्विफ्टच्या फॅशनची चर्चा