Pune Crime | पुरंदर तालुक्यातील दिवे गावात दारु पिण्याच्या वादातून दिवे येथे एकाचा निर्घुण खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दारु पिण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून दोघा जणांनी एकावर तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर, तोंडावर वार करुन त्याचा निर्घुण खून केला. ही घटना पुरंदर (Purander) तालुक्यातील दिवे गावात घडली. (Pune Crime)

अशोक लक्ष्मण भापकर (वय ५६, रा. भापकर मळा, दिवे, ता. पुरंदर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लता अशोक भापकर यांनी सासवड पोलीस ठाण्यात (Saswad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संजय बबन भापकर व किरण झेंडे (दोघे रा. दिवे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २५ जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता भापकर मळा येथे घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक भापकर आणि संजय भापकर, किरण झेंडे यांच्यात काळेवाडीच्या ढाब्यावर दारु पिण्याच्या कारणावरुन भांडणे झाली होती. या भांडणाच्या रागातून संजय भापकर, किरण झेंडे हे मध्यरात्री अशोक भापकर यांच्या घरी आले. अशोक भापकर यांना घराबाहेर बोलावले. त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, तोंडावर वार करुन त्यांचा खून (Murder in Pune) केला. या घटनेची माहिती मिळाल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील (SDPO Dhananjay Patil) यांनी घटनास्थळाला भेट दिली असून सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप (Police Inspector Annasaheb Gholap) अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Murder of a person at Dive in Purandar taluka due to a drinking dispute

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Shankar Sampate Suspended | पुण्यातील अवैध धंद्देवाल्यांशी WhatsApp कॉलिंगवर सदैव संपर्कात राहणारा पोलीस कर्मचारी शंकर संपते निलंबित; जाणून घ्या प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर,
गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3573 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 33,914 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | खोटा दस्त अस्तित्वात आणुन मोठी आर्थिक फसवणूक ! हनिफ सोमजी, सोहेल सोमजी, अलनेश सोमजी आणि जेनिस सोमजीवर गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर,
चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Special Tips For Good Sleep | रात्री शांत झोप लागत नसेल तर उपयोगी पडतील एक्सपर्टच्या ‘या’ 9 टिप्स; जाणून घ्या