Pune Crime | भादलवाडीमध्ये गळा चिरुन तरुणाचा खुन

पुणे : Pune Crime | भादलवाडी येथील शेतात एका तरुणाचा धारधार हत्याराने गळा चिरुन खुन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महेश दत्तात्रय चव्हाण (वय ३४, रा. रावणगाव, एरीगेशन कॉलनी, ता. दौंड) असे खुन झालेल्या तरुणाचे (Pune Crime) नाव आहे.

याप्रकरणी त्यांचा भाऊ नितीन दत्तात्रय चव्हाण (वय ३८, रा. रावणगाव, ता. दौंड) यांनी भिगवण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना भादलवाडी गावाच्या हद्दीत निरा भिमा नदी जोड प्रकल्प शॉपनंबर ६ जवळील शेत जमिनीत मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या पूर्वी घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश चव्हाण हा एका पेट्रोल पंपावर काम करीत होता. एक महिन्यापूर्वी त्याने हे काम सोडले होते. तो कर्जबाजारीही होता. त्याला पत्नी व २ मुले आहेत. त्याच्याकडे पैसे नसल्याने तो रविवारी रक्षाबंधनासाठी गेला नाही. कोणाकडून तरी पैसे उसने घेऊन तो सोमवारी रक्षाबंधनाला गेला होता. तेथून तो भादलवाडी येथे सासरी आला होता. त्यानंतर सायंकाळी मित्रांना भेटून येतो, असे सांगून तो बाहेर गेला ते परत आलाच नाही. दुसर्‍या दिवशी सासरवाडीपासून सुमारे काही किलोमीटर अंतरावर डोंगराजवळील शेतात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा गळा चिरुन खुन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

हे देखील वाचा

Pune Crime | निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबावर 1.20 कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांची 35 हजार रुपयांपर्यंत वाढली Salary, सरकारने पूर्ण केली मोठी मागणी

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Murder of a youth by slitting his throat in Bhadalwadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update