Pune Crime | पुण्याच्या हडपसरमध्ये गळ्यावर वार करुन रिक्षाचालकाचा खून

पुणे : Pune Crime | पुणे शहरात पहाटेच्या सुमारास एकाच वेळी दोन ठिकाणी दोन तरुणाच्या खूनाचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर येथील सोलापूर रोडवरील चौकात एका रिक्षाचालकाच्या (Murder of Auto Rickshaw Driver in Hadapsar) गळ्यावर वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार पहाटे ६ वाजता उघडकीस (Pune Crime) आला.

प्रदीप शिवाजी गवळी Pradeep Shivaji Gawali (वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पंधरा चौकात प्रदीप गवळी याचा मृतदेह पडला असल्याची माहिती नागरिकांनी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्याचे (Hadapsar Police Station) पोलीस निरीक्षक राजू अडागळे (Police Inspector Raju Adagale) यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. प्रदीप गवळी याच्या गळ्यावर वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) पाठविण्यात आला आहे.

प्रदीप गवळी हे रिक्षाचालक असून खूनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गवळी यांचा कोणाशी वाद होता का, ही घटना घडताना कोणी पाहिले का याची पोलीस चौकशी करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune Crime | हडपसरचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदमांची उचलबांगडी ! अवैध धंद्यांमुळं कारवाई? ‘त्या’ कर्मचार्‍यांमुळे वरिष्ठ ‘गोत्यात’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | murder of auto rickshaw driver in hadapsar area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update