Pune Crime | चुलत भावाचा खून करुन मृतदेह पुरला शेतात, पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चुलत भावाचा शेतात नेऊन लाकडी दांडक्याने मारुन खून (Murder in Pune) करुन पुरवा नष्ट करण्यासाठी मृतदेह ऊसाच्या शेतात खड्ड्यात पुरला. या गुन्ह्याचा उलघडा करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) भिगवण पोलिसांना (Bhigwan police) यश आले असून पोलिसांनी 6 महिन्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. खुनाची ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे 21 ऑगस्ट 2021 रोजी घडली होती.

 

सुजित संभाजी जगताप Sujit Sambhaji Jagtap (वय-32 रा. शेटफळगढे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकणी सुजितचा चुलत भाऊ (Cousin) किशोर बाळासाो जगताप Kishor Balaso Jagtap (वय-30 रा. शेटफळगढे) याला भिगवण पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मयत सुजित याचे वडील संभाजी शिवाजी जगताप (Sambhaji Shivaji Jagtap) यांनी 23 ऑगस्ट 2021 रोजी भिगवण पोलीस ठाण्यात (Bhigwan police station) सुजित बेपत्ता (Missing) झाल्याची तक्रार दिली होती. (Pune Crime)

 

घटनेच्या दिवशी सुजित जगताप याला सकाळी 11.30 च्या सुमारास चुलत भाऊ किशोर याचा फोन आला होता. सुजितने घरात किशोरने शेतात बोलावले असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला मात्र परत घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी सुजित बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रक विश्लेषण आणि गोपनिय माहितीच्या आधारे किशोर जगताप याला ताब्यात घेतले.

सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चुलत भाऊ सुजित याला शेतात नेऊन खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने मारुन त्याचा खुन केल्याची कबुली दिली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह (Deadbody) गोणीमध्ये भरुन उसाच्या शेतात खोल खड्डा खोदून पुरल्याची कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेह उकरुन बाहेर काढून ओळख पटवली. कोणताही पुरवा नसताना भिगवण पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

 

ही कारवाई पुणे ग्रमीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite),
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Sub-Divisional Police Officer Ganesh Ingle)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार (API Dilip Pawar),
पोलीस उपनिरीक्षक विनायक दडसपाटील (PSI Vinayak Dadaspatil), सुभाष रुपनवर (PSI Subhash Rupanwar),
पोलीस अंमलदार नाना वीर, सचिन पवार, महेश माने, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, अक्षय कुंभार,
गणेश पालसांडे, आप्पा भांडवलकर, पोलीस मित्र अतुल माने, अनिल धवडे, सुहास पालकर यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Murder of cousin’s body buried in the field, Pune Rural Police solved the crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे, केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

 

Pune Corona | चिंताजनक ! पुणे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजारांच्यावर, गेल्या 24 तासात 2200 हून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | चिंताजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 817 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी