Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात पत्नीनेच बहिणीच्या पतीशी संगनमत करुन पतीचा आवळला गळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरगुती कारणावरुन पत्नीने बहिणीच्या पतीशी संगनमत करुन पतीचा गळा आवळून त्याचा खून (Murder in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) दोघांना अटक केली आहे. (Pune Crime)

गजेंदर चित्तरसिंग नायक (वय ३६) आणि अंजली कप्तानसिंग चव्हाण ऊर्फ नायक (वय ३२, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कप्तानसिंग नायक (वय ३७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कप्तानसिंग नायक हा बिगारी काम करीत होता. केशवनगर (Keshav Nagar, Mundhwa) येथील गुरुकृपा सोसायटीत ते रहातात. कप्तानसिंग हा मुळचा दिल्लीचा आहे.

 

तर त्याची पत्नी अंजली ही मुळची सोलापूर (Solapur) येथील राहणारी आहे. कप्तानसिंग याला दारुचे व्यसन होते. तो सतत दारु पिऊन पत्नीला मारहाण करीत असत. शनिवारी रात्री तो दारु पिऊन आला. त्याने पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून तिने साडुच्या मदतीने रविवारी दुपारी कप्तानसिंग याला बेदम मारहाण करुन त्याचा गळा आवळला (Pune Crime). त्यात कप्तानसिंग हा निपचित पडला होता. त्यानंतर तिने कप्तानसिंग उठत नसल्याचे शेजारच्यांना सांगितले.

 

घरमालकांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी कप्तानसिंग याला रुग्णालयात दाखल केले.
परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
शवविच्छेदन अहवालानुसार बेदम मारहाण आणि गळा आवळल्यामुळे मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हlनंद नाईकवाडी (Senior Police Inspector Brahmanand Naikwadi) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

Web Title : Pune Crime | murder of husband by wife in mundhwa keshav nagar area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात