Pune Crime | ‘कात्रजचा खून झाला !’ पुण्यात झळकला ‘फ्लेक्स’; उलट-सुलट चर्चेला ‘उधाण’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील (Pune Crime) कात्रज चौकामध्ये (Katraj Chowk) एक भला मोठा फ्लेक्स लावण्यात आला असून यावर ‘कात्रजचा खून झाला!’ असे लिहिण्यात आले आहे. काळ्या रंगाच्या या फ्लेक्सवर हातात चाकू दाखवण्यात आला आहे. या फ्लेक्समुळे पुण्यातील (Pune Crime) कात्रज परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा फ्लेक्स कोणी लावला हे समजू शकले नाही.

कात्रज चौकात लावण्यात आलेल्या फ्लेक्सची माहिती मिळताच पोलीस (Police) प्रशासन व महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दुपारी बाराच्या सुमारास पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांनी हा फ्लेक्स काढला.
या प्रकरणी अज्ञात नागरिकाविरोधात तक्रार (Pune Crime) दाखल करण्यात आली असून पोलिस फ्लेक्स लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

कात्रज चौकात लावण्यात आलेला हा फ्लेक्स (Murder of Katraj) रात्रीच्या सुमारास लावण्यात आला असावा.
या मुळे कात्रजमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तसेच हा फ्लेक्स लावण्या मागचे कारण काय आहे याबाबत चर्चा सुरु आहे.
मात्र, या फ्लेक्समुळे कात्रज गाव परिसरात उलटसुलट चर्चांना उधान आले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कात्रज येथील उड्डाण पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते झाले.
या उड्डण पुलामुळे कात्रज चौकातील अनेक व्यावसायिकांच्या व्यावसायावर परिणाम होणार आहे.
तसेच यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असल्याची चर्चा कात्रजमध्ये सध्या सुरु आहे.
या फ्लेक्सचे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

 

Web Title : Pune Crime | Murder of katraj flex in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Immunity | इम्युनिटी वाढवणे आणि थकवा घालवण्यासाठी आहारात समाविष्ट करा ‘हे’ 5 आयर्नयुक्त फूड्स; जाणून घ्या

FSSAI | ग्राहकांना खराब अन्न खाऊ घालणे रेस्टॉरंट, ढाबा चालकांना पडणार महागात ! 1 ऑक्टोबरपासून बिलावर 14 अंकी रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक

Gold Price Today | आजही सोन्याच्या किंमती उतरल्या; 10,200 रुपयांनी सोनं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर