Pune Crime | दसर्‍याच्या दिवशी दारुला पैसे न दिल्याने आईचा केला खून; पुण्याच्या नर्‍हे येथील घटनेतील मुलाला पोलिसांनी केले अटक

पुणे : Pune Crime | दारु पिण्याच्या व्यसनापायी मुलाने दसर्‍याच्या दिवशी आईला सुरी, हातातील कड्याने, लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.

सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Police Station) आईचा खून करणार्‍या मुलाला अटक केली आहे. सचिन दत्तोपंत कुलथे (वय ३१, रा. महालक्ष्मी आंगन, अभिनव कॉलेज रोड, नर्‍हे) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. तर, विमल दत्तोपंत कुलथे (वय ६०) असे खून झालेल्या आईचे नाव आहे.

याप्रकरणी अनिता मोहन चिंतामणी (वय ४४, रा. नर्‍हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (गु. र. नं. ४५०/२१) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन याला दारु पिण्याचे व्यसन आहे. तो काही कामधंदा करीत नाही. मौजमजा करण्यासाठी तो आईकडे नेहमी पैशाची मागणी करत असे. त्याच्या या कृत्यामुळे त्याची पत्नी त्याला एक वर्षापूर्वी सोडून माहेरी निघून गेली आहे.

Gold Mutual Fund | अवघ्या 500 रुपयात खरेदी करू शकता सोने, Gold मध्ये करा गुंतवणूक; मिळेल शानदार रिटर्न

दारु पिण्यासाठी आई पैसे देत नसल्याने तो तिला मारहाण करीत असे. घटस्थापनेच्या दिवशी अनिता चिंतामणी या आपल्या आईला भेटायला माहेरी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना आपल्या आईच्या अंगावर वळ दिसले. तेव्हा त्यांनी चौकशी केल्यावर सचिनने मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले होते. कोणालाही तो घरी येऊ देत नसे. फिर्यादी यांनी आपण पोलिसांकडे तक्रार (Pune Crime) करु असे सांगितल्यावर मुलगा आणखी मारेन, म्हणून त्यांनी तक्रार करायला नकार दिला व तू सारखी येत जाऊ नको, असे त्यांना सांगितले होते.

त्यानंतर दसर्‍याच्या दिवशी १५ ऑक्टोबरला सकाळी सचिन याने आईकडे दारुसाठी पैशांची मागणी केली.
आईने पैसे न दिल्याने त्याने लाकडी दांडक्याने व कशातरी साहाय्याने त्यांना मारहाण केली.
त्यात विमल यांचा मृत्यु झाला. सचिन कुलथे हा पळून गेला.
हे समजल्यावर पोलिसांनी विमल कुलथे यांना ससून रुग्णालयात नेले़ परंतु, त्यांचा मृत्यु झाला होता.
शवविच्छेदनात मारहाण व अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले.
विमल कुलथे यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांच्या मुलीने फिर्याद (Pune Crime) दिली.
सिंहगड रोड पोलिसांनी सचिन कुलथे याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश कणसे (API prakash kanse) अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरातील भाववाढीचा आलेख अजूनही चढताच

Maruti लवकरच लाँच करणार ऑफ रोड SUV Jimny Jeep जी देणार Mahindra Thar ला टक्कर, जाणून घ्या संपूर्ण रिपोर्ट

Maharashtra Unlock | आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले – ‘दिवाळीनंतर एका डोसवर मुक्त संचार’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Murder of mother in sinhagad raod area of pune, pune police arrest son

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update