Pune Crime | पुणे -पंढरपुर पालखी मार्गावर कुख्यात गुंड गणेश रासकरची ‘गेम’, डोक्यात गोळीबार करून केला ‘खात्मा’

पुणे / निरा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथे शुक्रवारी (दि. 16 ) रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुणे -पंढरपुर पालखी मार्गावरील एका दुकानासमोर गोळीबाराची (Pune Crime) घटना घडली. या गोळीबारात नीरा येथील कुप्रसिद्ध गुंड गणेश रासकर (वय 35, रा. निरा स्टेशन मस्जिद जवळ) याचा खात्मा झाला आहे. गुंड गणेश रासकरची गेम झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी (Rural Police) परिसरात नाकेबंदी केली आहे.

या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नीरा येथील पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावरील एस.टी.स्टँड नजीक गुंड गणेश विठ्ठल रासकर Ganesh Vitthal Raskar (35) हा पल्सर गाडीवर आला होता. त्याच्यावर पाठीमागून गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या डोक्याच्या मागच्या भागात खोलवर जखम झाली आहे. त्याला प्रथम नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारापूर्वीच जखमी रासकार मृत आल्याचे सांगितले. पुढिल सोपस्करासाठी जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास करीत आहेत.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

घटनास्थळी पुणे ग्रामीणच्या बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते (additional superintendent of police milind mohite), भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी (bhor police) आणि नीरा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस व जेजुरी पोलीस स्टेशनचे (Jejuri police station) पोलीस निरिक्षक सुनिल महाडीक यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

गौरव लखडे आणि निखील डावरे (रा. फलटण, जि. सातारा) यांनी गावठी पिस्तुलातून गुंड गणेश रासकर याच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी लखडे आणि डावरे याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Web Titel :- Pune Crime | murder of notorious goon Ganesh Raskar on Pune-Pandharpur palkhi route near nira railway station

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या

Ayurveda Morning Routine | सकाळी उठून करा ही 8 कामे, नेहमी रहाल निरोगी आणि आनंदी

clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय

Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या