Pune Crime | मुंबईला जाण्यासाठी बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून; पुणे स्टेशन परिसरातील घटना, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुंबईला जाण्यासाठी बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे स्टेशन परिसरा (Pune station premises) त ही घटना घडली आहे. खून (muder) कोणी केला हे अद्याप समजू शकलेले नाही.Pune Crime | murder of tourist in pune railway station area

संजय बाबू कदम (वय 35, रा. घाटकोपर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्या (Bundgarden Police Thane) त गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक संतोष कांजळे यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम हे शिरूरमधील आंबेगाव येथे एका हॉटेलात काम करत होते. मूळचे घाटकोपर येथील परेरावाडी येथील आहेत. दोन दिवसांपूर्वी (सोमवारी) रात्री घाटकोपर येथे जाण्यासाठी पुणे स्टेशन परिसरात आले होते. ते साधू वासवणी चौकातून आलंकार रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विजय सेल्स समोरील बस स्टॉपवर झोपले होते. यादरम्यान मध्यरात्री साडे बारा ते एक वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी तीक्ष्ण हत्याराने डोळ्यांच्या वर आणि डोक्यात मारहाण करून त्यांचा खून केला.

मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान खुन चोरीच्या उद्देशाने झाला असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप तरी या खुनाचा छडा लागलेला नाही.

दरम्यान पुणे स्टेशन परिसर आणि ससून परिसरात सतत चोरीच्या आणि मारहाणकरून लुटण्याच्या घटना घडत आहेत.
मध्यरात्री या परिसरात गर्दुले, दारुडे व चोरट्याचा राबता असतो.
त्यामुळे पोलिसांची पेट्रोलिंग आणि गस्त नेमकी असते कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाहेर गावाला जाण्यासाठी आलेले व्यक्ती आणि बाहेरून पुण्यात आलेले बहुसंख्य प्रवासी या परिसरात उतरतात.
पण, त्यांच्या सुरक्षा राम भरोसेच अशी म्हणायची वेळ आली आहे.

Web Title : Pune Crime | murder of tourist in pune railway station area

हे देखील वाचा

Pune News | जामिनावर बाहेर अससेल्या 13000 कैद्यांसाठी खुशखबर ! ‘तो’ पर्यंत त्यांना परत जेलमध्ये बोलावले जाणार नाही

AADHAAR Updates | तुमच्या ‘आधार’सोबत होऊ शकते फसवणूक, रोखण्यासाठी आहेत ‘या’ टिप्स; जाणून घ्या

Gold Price Today | सोने तेजीनंतर सुद्धा मिळत आहे 10 हजार रुपये स्वस्त, चेक करा 10 ग्रॅम गोल्डचे नवीन दर