Pune Crime | पुणे-नगर महामार्गाजवळील शिक्रापूरामध्ये तृतीयपंथीयाचा खून; पुणे ग्रामीण पोलिसांकडून 4 तासात ‘पर्दाफाश’; मर्डरचं कारण आलं समोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे -नगर महामार्गाजवळील (Pune-Nagar Highway) शिक्रापूर (Sikrapur News) येथील बजरंगवाडी (Bajrangwadi) येथे रस्त्यालगत एका तृतीयपंथीयाच्या खूनाचा (murder of transgender in pune district) गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Pune Rural Police Local Crime Branch) चार तासात उलघडला असून दोघांना अटक करण्यात आली (Pune Crime) आहे.

 

आशु ऊर्फ आनिश रामानंद यादव Ashu alias Anish Ramanand Yadav (वय २३, रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, ता. शिरुर – Shirur) असे खून झालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. त्याच्या खूनप्रकरणी धर्मु जोहीतराम ठाकूर Dharmu Johitram Thakur (वय २०), युगल लालसिंग ठाकूर Yugal Lalsingh Thakur (वय १९, दोघे रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, ता. शिरुर, मुळ गाव ढाबा, ता. डोंगरगाव, जि. राजनंदगाव, छत्तीसगड) अशी अटक केलेल्यांची (Pune Crime) नावे आहेत.

 

शिक्रापूर परिसरातील तोरणा हॉटेलसमोरील (Hotel Torna Shikrapur) हरीष येवले यांच्या प्लॉटिंगलगत मोकळ्या जागेत एका तृतीयपंथीयाचा मृतदेह रविवारी सकाळी १० वाजता आढळून आला होता. आशु असे त्याचे नाव असल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (Pune Rural Police LCB) पथकाने त्याला शेवटचे कोठे पाहण्यात आले, याची परिसरातील लोकांकडे चौकशी करण्यात आली आहे. त्याआधारे तो धर्मु ठाकूर व युगल ठाकूर यांच्याबरोबर असल्याची माहिती मिळाली. त्या दोघांचा शोध सुरु केल्यावर ते गावाला पळून जाण्याच्या तयारी असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी शिक्रापूर-चाकण चौक (Chakan Chowk) परिसरात दोघांना पकडले.

 

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी खून (murder in pune) केल्याची कबुली दिली.
हे तिघेही खून केलेल्या ठिकाणाजवळ दारु पित बसले होते. धर्मु याने आशु याच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला.
पैशाचे देवाण घेवाणीतून त्यांच्यात वाद झाला. दारुच्या नशेत त्यांनी आशुचा खून केल्याचे निष्पन्न (Pune Crime) झाले.
पुढील तपासासाठी दोघांना शिक्रापूर पोलिसांच्या (Shikrapur Police Station) ताब्यात देण्यात आले आहे.

 

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे (API Sachin Kale),
सहायक फौजदार तुषार पंदारे, हवालदार जनार्दन शेळके, हवालदार राजू मोमीन, अजित भुजबळ,
पोलीस अंमलदार मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, चेतन पाटील यांनी ही कामगिरी केली.

 

Web Title :- Pune Crime | murder of transgender in shikrapur near Pune-Nagar highway; Exposed by Pune Rural Police local crime branch in 4 hours; The cause of the murder came to light

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | व्हिडीओ कॉलवर ‘नग्न’ होण्यास सांगुन काढले ‘स्क्रीन शॉट’, ‘विवस्त्र’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 16 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार

 

Pune Crime | पुण्यात SRPF च्या परिक्षेसाठी भावाच्या नावावर बसला; ‘ब्ल्यु टुथ’द्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न, हडपसर पोलिसांकडून अटक

 

Devendra Fadnavis | परीक्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरुय, CBI चौकशी झाली पाहिजे; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी (व्हिडिओ)