Pune Crime | पुण्यात तृतीयपंथी ‘आशु उर्फ आनिश’ खून, 4 तासात ‘धर्मु ठाकुर’ आणि युगल ठाकुर गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) शिक्रापूर येथील बजरंगवाडी (Bajrangwadi Shikrapur) येथे एका तृतीयपंथीयाचा खून (murder) केल्याची घटना रविवारी (दि.12) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली होती. तृतीयपंथीयाचा खून करुन परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) पथकाने दोघांना अटक (Arrest) केली. खुनाची (Pune Crime) घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या चार तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 

आशु उर्फ आनिश रामानंद यादव (सध्या रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, ता. शिरुर) असे खून झालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. धर्मु जोडीतराम ठाकुर (वय-20), युगल लालसिंग ठाकुर (वय-19 सध्या दोघे रा. साकोरे हॉस्पिटलमागे, बजरंगवाडी शिक्रापूर मूळ रा. ढाबा, ता. डोंगरगाव जि. राजनंदगाव, राज्य छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अनिता सोमनाथ सासवडे (रा. बजरंगवाडी शिक्रापुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur police station) फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गालगत (Pune-Nagar Highway) बजरंगवाडी येथील तोरणा हॉटेल समोरील मोकळ्या जागेत तृतीयपंथी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला (Pune Rural Police Local Crime Branch) आरोपींची माहिती मिळाली. आरोपींचा शोध घेत असताना दोघेही छत्तीसगढ (Chhattisgarh) येथे पळून जाण्याच्या तयारीत असून शिक्रापूर-चाकण चौकाकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिक्रापुर-चाकण चौकाच्या (Chakan Chowk) परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली.

 

…म्हणून केला खून

आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी आणि मयत हे तिघे दारु पित बसले होते. त्यावेळी धर्मु ठाकूर याने मयत तृतीयपंथी आशु याच्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पैशाच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादातून दोघांनी तृतीयपंथीय आशुचा खून (murder of transgender) केल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींना शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या (Shikrapur Police Station) ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (Police Inspector Hemant Shedge) व पथक करीत आहेत. (Pune Crime)

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite)
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Senior Police Inspector Ashok Shelke),
सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे (API Sachin Kale), सहायक पोलीस फौजदार तुषार पंदारे,
पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजु मोमीण, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, चेतन पाटील यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | murder of transgender in shikrapur of pune district, two criminal are arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील MIT College च्या फ्रेशर्स पार्टीत ‘राडा’, सीनिअर कडून ज्युनिअर्संना मारहाण

7th Pay Commission | ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांचा होऊ शकतो 1.28 लाख रुपयांपर्यंत फायदा, जाणून घ्या का आणि कसा?

Sweet Potato Benefits | हिवाळ्यात रताळे खाल्ल्याने दात आणि हाडे होतात मजबूत, जाणून घ्या 7 जबरदस्त फायदे