Pune Crime | विश्रांतवाडी परिसरात मानलेल्या बहिणीला त्रास दिल्याचा जाब विचारल्याने दोघांचा खून; एकाला ढकलून दिल्याचे पाहिल्याने दुसर्‍यालाही मारले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मानलेल्या बहिणीला त्रास देणार्‍यास जाब विचारल्याच्या रागातून दोघांना खाणीमध्ये (Mines) ढकलून देऊन खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विश्रांतवाडी (Vishrantwadi) परिसरातून बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे मृतदेह गेल्या शनिवारी खाणीमध्ये आढळून आले होते. शरीरावर कोणत्याही मारहाणीच्या (Pune Crime) खुणा नसल्याचे त्यांच्या मृत्युबाबत संशय निर्माण झाला होता. विकीची गुन्हेगारी पार्श्वभूमी (Criminal Background) असल्याने पोलिसांनी (Pune Police) केलेल्या तपासात या खूनाचे (Murder In Pune) गुढ उकलले.

 

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अनिकेत उरणकर ऊर्फ हुर्‍या Aniket Urankar alias Hurraya (वय 24, रा. औंध रोड) आणि प्रसन्न थुल ऊर्फ गोट्या Prasanna Thul alias Gotya (वय 21, रा. पंचशिलनगर, येरवडा – Yerawada) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला असून थुल याला अटक (Arrest) केली आहे. विकी प्रकाश लंके Vicky Prakash Lanka (वय 20) आणि सुशांत सचिन गडदे Sushant Sachin Gadde (वय 21, दोघेही रा. विश्रांतवाडी) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मोहित नानाभाऊ लंके Mohit Nanabhau Lanka (वय 18, रा. कस्तुरबा सोसायटी, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi police station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये (Lockdown) विकी आणि आरोपी यांच्यात भांडणे झाली होती. विकीच्या मानलेल्या बहिणीशी अनिकेतचा मित्र आकाश वाघमारे (Akash Waghmare) हा छेड काढत होता. त्याचा विकी याने जाब विचारला होता. त्यावरुन त्यांच्यात 6 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता वाद झाला होता. त्यानंतर आरोपींनी विकी आणि सुशांत यांना दारू पाजली. घराजवळ असलेल्या पाण्याचे टाकीजवळ घेऊन जाऊन तेथून त्यांना खाणीत ढकलून दिले. त्यात पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या नातेवाईकांनी हरविल्याची तक्रार 8 जून रोजी दिली. त्यानंतर 11 जून रोजी दोघांचे मृतदेह खाणीच्या पाण्यात आढळून आले.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. व्ही. भापकर (Senior Police Inspector D.V. Bhapkar) यांनी सांगितले की,
या दोघांच्या शरीरावर मारहाणीच्या किंवा शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या नाहीत.
विकीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या शक्यता गृहीत धरुन तपास सुरु केला.
त्यात विकी व सुशांत यांच्याबरोबर शेवटच्या वेळी कोण होते, याचा शोध घेतल्यावर थुल आणि अनिकेत यांची नावे समोर आली.
थुल याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने अनिकेतच्या मदतीने खून केल्याचे सांगितले.

 

मुलीच्या कारणावरून विकीला मारल्याचे सांगितले

दोघांनी दारु पाजून विकीला खाणीजवळ नेले. तेथून त्याला पाण्यात ढकलून दिले. हा प्रकार सुशांत याने पाहिला होता.
त्यामुळे त्यालाही या दोघांनी पाण्यात ढकलून दिल्याचे थुल याने पोलिसांना सांगितले.

 

 

Web Title :- Pune Crime | Murder of two persons for allegedly harassing a supposed sister in Vishrantwadi area Seeing that one was pushed the other was also killed

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा