Pune Crime | बिबवेवाडीत कोयत्याने सपासप वार करून तरूणाचा खून, युवकाला ‘खल्लास’ केल्यानंतर कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चोघांनी मिळून 21 वर्षीय तरूणावर कोयत्याने सपासप वार करून खून (Murder In Pune) केल्याची घटना बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगरमधील (Super Indira Nagar Bibvewadi Pune) सुवर्णयुग मित्र मंडळाजवळ घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात (Bibvewadi Police Station) चौघांविरूध्द गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. तरूणाला खल्लास केल्यानंतर आरोपींनी त्यांच्याजवळील कोयते हवेत फिरवून शिवीगाळ करत जर कोणी काही बोललात तर याद राखा असे जोरजोरात ओडवून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

योगेश रामचंद्र पवार Yogesh Ramchandra Pawar (21, रा. सुवर्णयुग मित्र मंडळ जवळ, सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, योगेशचा मित्र वैभव सोमनाथ घाटूळ (22, रा. टिळेकर नगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे – Katraj-Kondhwa Road) याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विश्वास शिंदे, नागेश फुलारे, सनि भोंडेकर, ओंकार खाटपे यांच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की योगेश पवार, वैभव घाटूळ आणि गणराज ठाकर हे फिर्यादीच्या मोटारसायकलवरून योगेशच्या घरी जात होते. ते सुपर इंदिरानगर येथे आले असता आरोपींनी पुर्वी झालेल्या भांडणावरून योगेशच्या दिशेने रंग फेकला. योगेशने गाडी थांबवून त्यांना जाब विचारला असता आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्यांनी त्याच्यावर सपासप वार केले. दरम्यान, काही क्षणातच योगेश रक्ताच्या थारोळयात जमिनीवर पडला. त्याला तात्काळ ससून रूग्णालयात (Sasoon Hospital) नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. (Pune Crime)

पोलिस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलाडे (ACP Rajendra Galande),
वरिष्ठ निरीक्षक सुनिल झावरे (Senior Police Inspector Sunil Zaware), पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar),
सहाय्यक निरीक्षक प्रविण काळुखे (API Pravin Kalukhe), API किरण देशमुख (API Kiran Deshmukh),
उपनिरीक्षक यश बोराटे (PSI Yash Borate), PSI रामकृष्ण काळे (PSI Ramkrushna Kale), PSI संजय अदलिंग (PSI Sanjay Adling)
आदींनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक राजकुमार बरडे (API Rajkumar Barde) करीत आहेत.
गुन्हा केल्यापासून आरोपी फरार झाले असून बिबवेवाडी पोलिस ठाण्यातील (Pune Police)
अधिकारी, कर्मचारी आणि गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) अधिकारी व कर्मचारी आरोपींचा शोध घेत आहेत.

 

ही घटना शुक्रवारी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुपर इंदिरानगर परिसरातील घडली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Murder of Yogesh Ramchandra Pawar in Super Indira Nagar Bibvewadi Pune, FIR on Vishwas Shinde, Nagesh Phulare, Sunny Bhondekar, Omkar Khatpe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Benefits Of Cloves | Liver, डायबिटीज, पोट, दात आणि Bones साठी जबरदस्त आहे ‘ही’ एक घरगुती गोष्ट, Sugar Level करते कंट्रोल

 

Health Benefits Of Peanuts | शेंगदाणे आरोग्यासाठी फायदेशीर, ‘या’ आजाराचाही धोका होतो कमी; जाणून घ्या

 

NCP Vs BJP Maharashtra | ‘शरद पवार पावसात भिजले आणि भाजपला न्युमोनिया’; राष्ट्रवादीचंं भाजपला प्रत्युत्तर !