Pune Crime | आखाड पार्टीवरुन तरुणाचा खून; पूना हॉस्पिटलजवळील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आखाड पार्टी (Akhad Party) करीत असताना झालेल्या वादातून तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा खून (Murder In Pune) केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. बारक्या जोरी (Barkya Jori) असे खून (Murder) झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime)

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण पूना हॉस्पिटलच्या (Poona Hospital) मागील बाजूला नदी किनारी आखाड पार्टी करीत बसले होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाले. वादाचे रुपांतर भांडणात झाले. त्यात बारक्या याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. तसेच दगडाने त्याचे डोके ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर आरोपी पळून गेले. गुरुवारी सकाळी हा प्रकार समोर आला. विश्रामबाग पोलीस (Vishram Bagh Police) घटनास्थळी पोहचले असून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.  (Pune Crime)

Web Title :- Pune Crime | Murder of young man from Akhad party; Incident near Poona Hospital

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा