Pune Crime | पुण्यात फक्त 20 रूपयांमुळं मित्राचा लाकडाने ठेचून निर्घृण खून; प्रचंड खळबळ

पुणे / राजगुरुनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दारु पिण्यास (drink alcohol) पैसे दिले नाही या कारणावरून मित्राने आपल्याच मित्राचा लाकडाने ठेचून निर्घृण खून (Murder in Pune) केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) राजगुरुनगर (Rajgurunagar) येथे घडली आहे. ही घटना खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक (Kharpudi Budruk taluka Khed ) येथे बुधवारी (दि.15) रात्री घडली आहे. या घटनेत (Pune Crime) एक जण गंभीर जखमी झाला आहे. रामदास सोपान थिटे Ramdas Sopan Thitte (वय-27 रा. सडकवस्ती रेटवडी, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन आठ तासात अटक (Arrest) केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. नितीन काळूराम काशिद Nitin Kaluram Kashid (वय-42 रा. खरपुडी, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री खेड-कनेरसर मार्गावर (Khed-Kanersar Road) खरपुडी गावच्या हद्दीत हॉटेल माथेरान गारवा येथे मयत रामदास आणि त्याचा मित्र दत्तात्रय टाकळकर (Dattatraya Takalkar) हे दारु पित बसले होते.

दरम्यान आरोपी नितीन काशिद हा दारुच्या नशेत पुन्हा दारु पिण्यासाठी आला होता. त्याने मयत रामदास याला दारु पिण्यासाठी 20 रुपये मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने रामदासला शिवीगाळ (Pune Crime) केली. रामदास आणि त्याचा मित्र टाकळकर हे दारुच्या नशेत रस्त्यावर आले असताना आरोपी काशिद याने लाकडी दांडक्याने थिटे याच्या डोक्यात जोरात प्रहार केला. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन थिटे याचा जागीच मृत्यू झाला. तर दत्तात्रय टाकळकर हा जखमी झाला आहे.

 

घटनेनंतर आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात होता.
पोलीस निरीक्षक सतीश गुरव (Police Inspector Satish Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष घोलप,
सचिन गिलबिले, मोहन अवघडे, स्वप्नील गाढवे, निखील गिरीगोसावी यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीचा शोध घेतला.
आरोपीला घटनेनंतर आठ तासात बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गुरव करित आहेत.

 

Web Title :- Pune Crime | murder of youth friends twenty rupees drink alcohol kharpudi rajgurunagar of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Akshay Kumar-OMG 2 | ‘OMG 2’ च्या शूटसाठी निघाला अक्षय कुमार, फॅन्सने शिव तांडव करत केलं स्वागत (व्हिडीओ)

Pune Crime | कोल्हापूरला जाण्यासाठी हात दाखविला ! बस न थांबविल्याने चालकाला मारहाण करणार्‍या तिघांना पुणे पोलिसांकडून अटक

 

Pune Crime | पुण्यातील 21 वर्षीय तरूणीला लग्नाच्या आमिषाने भूगाव येथील लॉजवर नेलं, बलात्काराच्या काही दिवसांनंतर केला ‘गर्भपात’