Pune Crime | पुण्याच्या मध्यवस्तीत तरुणाचा चाकूने सपासप वार करून खून; मित्र स्वतः हुन पोलिस ठाण्यात हजर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चेष्टा मस्करीमध्ये झालेल्या भांडणातून तरुणावर चाकूने वार करुन तरुणाचा खून (Murder) करण्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने मित्राचा चाकूने वार (Pune Crime) करुन स्वत: फरासखाना पोलीस ठाण्यात हजर (Faraskhana Police Station) झाला आहे.

अमन अशोक यादव (वय २६) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. आर सी एम गुजराती शाळेजवळ (RCM Gujarati School) हा प्रकार घडला असून सकाळी उघडकीस आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पाटील व त्याचा मित्र अमन यादव हे कचरा वेचण्याचे काम करतात. दोन -तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती. त्याचा राग पाटील याच्या मनात होता. आज सकाळी आर सी एम गुजराती शाळेजवळ पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी पाटील याने अमन यादव याच्यावर चाकूने वार करुन त्याचा खून (Murder in Pune) केला. त्यानंतर त्याची माहिती त्यानेच स्वत: पोलीस चौकीत येऊन दिली. या प्रकाराने पोलिसांमध्येही खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर तेथे एक मृतदेह पडलेला आढळून (Pune Crime) आला. मृतदेह ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) पाठविण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी रवाना झाले आहेत. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title : Pune Crime | murder of youth in faraskhana police station area near rcm gujrati school

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sitaram Kunte | निवृत्तीनंतर सीताराम कुंटे यांची ‘या’ महत्त्वाच्या पदी नियुक्ती

Maharashtra Rains | पुणे, मुंबई, नाशिकसह कोकणात पाऊस सुरु

IMD | पालघर, ठाणे आणि मुंबईत आज होऊ शकतो मुसळधार पाऊस; जाणून घ्या इतर ठिकाणचा अंदाज

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या

Health Test In 30 Sec | ‘या’ 3 सोप्या चाचण्या 30 सेकंदमध्ये सांगतील किती हेल्दी आहात तुम्ही? घरीच करा आरोग्य तपासणी; जाणून घ्या

Sameer Wankhede | समीर वानखेडेंची राज्य सरकारच्या ‘या’ समितीकडून चौकशी

Omicron Variant | भारतात आज मध्यरात्रीपासून प्रवाशांसाठी नवे नियम लागू, जाणून घ्या नवीन नियमावली

Omicron Variant | भारतात केवळ 20% लोकसंख्येला ओमिक्रॉनचा धोका, व्हेरिएंटचे ‘सॉफ्ट टार्गेट’ कोण? जाणून घ्या