Pune Crime | येरवड्यात पूर्व वैमनस्यातून दरबार बेकरीजवळ राहणाऱ्या तरुणाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | उसने पैसे देण्याघेण्यावरुन एक वर्षापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तिघांनी आपल्या मित्रावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा खून (Murder In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

इंजमाम जुबेर इद्रीसी Inzamam Zubair Idrisi (वय २२, रा. दरबार बेकरीजवळ, येरवडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. येरवडा पोलिसांनी (Pune Police) मोहसीन ऊर्फ मोबा बडेसाब शेख Mohsin alias Moba Badesab Shaikh (रा. लक्ष्मीनगर, येरवडा), मोईन कालु शेख (Moin Kalu Shaikh) आणि शहानबाज शेख (Shahanbaz Sheikh) या तिघांवर खूनाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. शहानबाज शेख याला अटक (Arrest) केली आहे.

 

याप्रकरणी अन्सार जुबेर इंद्रीसी Ansar Zubair Indrisi (वय १८, रा. येरवडा) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. ५००/२२) दिली आहे. हा प्रकार लोहगाव परिसरातील राजीव गांधी हॉस्पिटल जवळ २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच ते सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजमाम हा एका कंपनीत डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) म्हणून काम करीत होता. त्याचे एका वर्षापूर्वी मोईन कालु शेख याच्याबरोबर उसने पैसे देण्याघेण्यावरुन भांडणे झाली होती. हा राग मनात धरुन त्याने इतर दोघांच्या मदतीने इंजमाम याला जेवायला नेले. त्यानंतर त्याने भांडण उकरुन काढून त्याला बेदम मारहाण (Beating) करुन हत्याराने वार करुन त्याचा खून केला.
राजीव गांधी हॉस्पिटलजवळ मृतदेह पडला असल्याची माहिती सकाळी येरवडा पोलिसांना (Yerwada Police) मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केल्यानंतर या तिघांची नावे समोर आली.
पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे (Police Inspector Uttam Chakra) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Murder Of Youth In Yerwada Who Live Near Darbar Bekary

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा