Pune Crime | हडपसर-मुंढवा रोडवर तरूणाचा खून ! CCTV फुटेजमध्ये मर्डरचा ‘थरार’ कैद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हडपसर-मुंढवा रस्त्याने (Hadapsar Mundhwa Road) जाताना पाठीमागून आलेल्या दुचाकीचा धक्का लागला. यावर वाद झाल्याने झालेल्या भांडणात दोघा तरुणांनी केलेल्या मारहाणीत (Murder In Pune) एका तरुणाचा मृत्यू झाला. (Pune Crime)

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) दोघा तरुणांवर खूनाचा गुन्हा दाखल (Pune Murder News) केला आहे. अशोक शंकर राव Ashok Shankar Rao (वय ३०, रा. भोईराज सोसायटी, राजश्री शाहु शाळेमागे, मुंढवा) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime)

याप्रकरणी सागर शंकर राव (वय २०, रा. मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मुंढवा येथील हडपसर मुंढवा रोडवरील (Murder On Hadapsar Mundhwa Road) साई फर्निचर दुकानासमोर मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजता घडली.

अशोक राव हा फिर्यादी यांचा मोठा भाऊ आहे. तो मिळेल तेथे बिगारी काम करतो. अशोक हा काम शोधण्यासाठी मंगळवारी सकाळी दहा वाजता घरातून गेला होता. सायंकाळी घरी येत असताना साई फर्निचर येथे आला असताना पाठीमागून येणार्‍या दुचाकीचा त्याला धक्का लागला. तेव्हा अशोक याने बडबड केली. तेव्हा दुचाकीवरील दोघा तरुणांनी खाली उतरुन अशोक याला बेदम मारहाण केली. त्यात तो रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला. त्यातच त्याचा मृत्यु झाला. त्यानंतर दुचाकीवरील दोघेही जण पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai) आणि मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी (Senior Police Inspector Brahmanand Naikwadi) यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेच्या जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर दोघांच्या मारहाणीमुळेच अशोक राव याचा मृत्यु झाल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुंढवा पोलीस पसार झालेल्या दुचाकीस्वारांचा शोध घेत आहे.

Web Title : Pune Crime | Murder of youth on Hadapsar-Mundhwa road! CCTV footage captures the ‘thrill’ of the murder

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त