Pune Crime | बिबवेवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या फ्लेक्सवर फोटो छापला नसल्याच्या रागातून डोक्यात हातोडा घालून खून

पोलिसांकडून सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) लावलेल्या बॅनरवर (Banner) फोटो छापला नसल्याच्या रागातून सराईत गुन्हेगाराने (Pune Criminals) दोघांच्या डोक्यात हातोडा (Hammer) मारुन गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान आज (गुरुवार) मृत्यू (Murder In Pune) झाला. याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) सराईत गुन्हेगार नुरुद्दीन निजामउद्दीन मुल्ला (Nuruddin Nizamuddin Mulla) आणि त्याच्या साथीदार रवी चव्हाण (Ravi Chavan) यांच्यावर IPC 307, 302, 504, 34 महाराष्ट्र पोलीस अधिनियम (Maharashtra Police Act) 37 (1) (3) नुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करुन अटक (Arrest) केली आहे.

 

गंगाराम शिवाजी काळे (Gangaram Shivaji Kale) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पंडीत तिपन्ना कंटेनवरु Pandit Tipanna Containvaru (वय – 30 रा. अपर बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नुरुद्दीन मुल्ला (वय – 26) आणि रवी चव्हाण यांना अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.19) रात्री नऊच्या सुमारास बिबवेवाडी येथील जगताप डेअरीच्या (Jagtap Dairy) मागे घडला होता. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Bhim Jayanti) बिबवेवाडी येथे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर आरोपी मुल्ला याचा फोटो छापला नसल्याचा राग त्याच्या मनात होता. मंगळवारी रात्री मयत गंगाराम शिवाजी काळे आणि फिर्यादी पंडीत कंटेनवरु हे रात्री नऊच्या सुमारास गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी मुल्ला आणि रवी चव्हाण हे दुचाकीवरुन त्या ठिकाणी आले.

 

आरोपी मुल्ला याने बॅनरवर फोटो छापला नसल्याच्या रागातून फिर्यादी आणि त्यांचा मित्र गंगाराम काळे याला तुम्हाला खल्लास करतो असे म्हणत शिवीगाळ केली.
तसेच त्याच्याकडे असलेल्या लोखंडी हातोड्याने फिर्यादी आणि काळे यांच्या डोक्यात जोरात मारुन गंभीर जखमी केले.
तर रवी चव्हाण याने गंगाराम यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) केली.
यामध्ये गंभीर जखमी (Seriously Injured) झाल्याने काळे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र, उपचारादरम्यान काळे यांचा गुरुवारी मृत्यू झाला.
पोलिसांनी सुरुवातीला खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
यानंतर आता खुनाचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग (PSI Sanjay Adling) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Murder with a hammer in the head out of anger that the photo was not printed on Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Flex in Bibvewadi area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा