Pune Crime | पूर्व वैमनस्यातून 26 वर्षीय युवकाचा खून; दोघांवर FIR, तर एकजण पोलिसांच्या ताब्यात

पुणे / पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | पुर्वी झालेल्या वादातुन एका 26 वर्षीय युवकाचा खून (Murder) करण्यात आला आहे. (गुरुवारी) 4 नोव्हेबर रोजी रात्री 10 ते (शुक्रवारी) 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. मृत्युंजय कुमार (Mrityunjay Kumar) (वय 26, मूळ रा. बिहार), असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे (Pune Crime) परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणावरून दोघांविरूद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यातील एकाला अटक (Arrested) करण्यात आले. तर एकाचा शोध पोलिस घेत आहेत.

 

याबाबत माहिती अशी की, पृथ्वी एंटरप्रायझेस या कंपनीच्या मजुरांना राहण्यासाठी रहाटणी येथील तापकीर मळ्याजवळ लेबर कॅम्प तयार करण्यात आला आहे.
यामध्ये मृत्यूंजय, पंचानंद व मांझी हे तिघे राहत होते. मृत्युंजय आणि आरोपी यांच्यात एक महिन्यापूर्वी वाद झाला होता.
या वादाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून मृत्युंजयच्या डोक्यात अज्ञात वस्तूने जबर घाव (Pune Crime) घातला.
यात मृत्यूंजयला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
यानंतर दोघे आरोपी पसार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास समोर आली.
पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृत्यूंजयच्या घरच्यांना कळवण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणी पंचानंद मुन्ना राम (Panchananda Munna Ram) (वय 21) आणि जवाहर मांझी (Jawahar Manjhi) (दोघेही रा. मूळ बिहार)
यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला.
तसेच आरोपी पंचानंद याला पुणे रेल्वे स्टेशन येथून पोलिसांकडून अटक (Pune Crime) करण्यात आली आहे.
आरोपी मांझी हा पसार असुन त्याचा शोध सुरू आहे.
दरम्यान, सतीश वैजिनाथ वाव्हळ (वय 33, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली.

 

Web Title : pune crime | murder young man out enmity in pimpri chinchwad police registered FIR on Two one detained

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | बोनसमधील रक्कम पार्टीसाठी देण्यास नकार; येरवड्यात तरूणावर सपासप वार करून खुनाचा प्रयत्न

ITR Filing | फॉर्म 16 शिवाय भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, सविस्तर जाणून घ्या पद्धत

Needleless Vaccine | कोरोनाची बिगर इंजेक्शनची लस सुद्धा देणार सरकार, 1 कोटी डोस खरेदीचा आदेश