Pune Crime | करारनाम्याचा भंग करुन कुणाल प्रॉपटीजच्या मालकाने विकली परस्पर जमीन; लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जमीन खरेदी करण्याचा करारनामा करुन व्यवहार पूर्ण न करता परस्पर बनावट कागदपत्रे (Fake Documents) तयार करुन कुणाल प्रॉपटीजच्या मालकाने (Kunal Properties) ही जमीन परस्पर अन्य दोघांना विकून फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) कुणाल प्रॉपटीजचे बापू बबन काळे Bapu Baban Kale (रा. निमगाव म्हाळुंगे, शिरुर), सुजाता धर्मवीर सिंह / देशमुख Sujata Dharmaveer Singh / Deshmukh (रा. खराडी),
परशुराम एस जाधव Parshuram S Jadhav (रा. गणेश पार्क, हवेली) व इतर त्यांच्या सोबतचे ३ ते ४ पुरुष व ५ ते ६ अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

याबाबत धनराज ज्ञानोबा गोरे (वय ६४, रा. गोरेवस्ती, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार हवेलीतील गट नंबर १५५१ मध्ये २२ ऑक्टोंबर २०२० ते २७ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल प्रॉपर्टीजचे बापू काळे यांनी फिर्यादी यांची ८ गुंठे जमीन ही प्रति गुंठा ९ लाख रुपये दराने विकत घेण्याबाबत करारनामा केला होता.
करारनामानुसार त्यांनी पैशांचा मोबदला वेळेत दिला नसून व्यवहार पूर्ण करण्यास टाळाटाळ केली.
फिर्यादीची जमीन मिळकतीबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून विकास आराखडा कमर्शियल झोनसाठी राखीव म्हणून मंजूर झाल्याचे समजल्याने बापू काळे याने पुन्हा फिर्यादीशी संपर्क सांधून तुमचे क्षेत्र घेण्यास तयार असल्याचे सांगितले.
फिर्यादी यांनी त्याला नकार दिला.
तेव्हा त्यांच्या संमतीशिवाय ती जागा परस्पर सुजाता सिंह/देशमुख व परशुराम जाधव यांच्याशी फिर्यादीच्या जागेचा बेकायदेशीर करारनामा केला.
त्यात मोहन येळे यांची बनावट सही व अंगठा केला परशुराम जाधव, सुजाता सिंह/देशमुख व त्यांचे सहकारी यांनी फिर्यादी यांच्या जमिनीचा बेकायदेशीररित्या ताबा घेण्याचा प्रयत्न केला.
त्याला फिर्यादी यांनी विरोध केल्यावर तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटीची केस दाखल करुन इतरही खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.
घरात शिरुन तुम्ही आमच्या नादाला लागू नका,
तुमचे नुकसान होईल अशी धमकी देऊन निघून गेले.
गोरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Mutual land sold by the owner of Kunal Properties in breach of contract
A case has been registered at Lonikand police station cheating fraud case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा