Pune Crime | पुण्यातील कोंढवा परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (NIA) छापेमारी; इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस व कागदपत्रे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्यावरुन (Terrorist Attack Conspiracy) आणि इसिस Islamic State In Iraq and Syria (ISIS) या दहशतवादी संघटनेच्या प्रचार करीत असल्यावरुन राष्ट्रीय तपास संस्थेने National Investigation Agency (NIA) पुण्यात कोंढवा (Kondhwa) परिसरात राहणार्‍या ताल्हा लियाकत खान Talha Liyaqat Khan Kondhwa (वय ३८) याच्या घरी छापे टाकले आहेत.
त्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस (Electronic Device) व काही कागदपत्रे (Important Documents) जप्त केली आहेत. (Pune Crime)

 

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) काश्मीर कुटुंब जहांजेब सामी वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग (रा. अखोला विहार, जामिया नगर, दिल्ली) यांना २० मार्च २०२० रोजी अटक केली होती.
या दोघांचा इस्लामिक स्टेट खोरासन प्रोव्हिन्स (आयएस के पी) या इसिस च्याच संघटनेशी संबंध असल्याचा आरोपावरुन त्यांना अटक करण्यात आली होती (Pune Crime).
त्यानंतर याचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत चार आरोपींची नावे निष्पन्न झाली होती.
अब्दुल्ला बासित, सादिया अन्वर शेख, नाबील सिद्दीक खत्री आणि अबदूर रहेमान ऊर्फ डॉ ब्रेव्ह यांना अटक करण्यात आली होती.
या चौघांसह ६ जणांवर एनआयएने दोषारोपपत्र दाखल केले आहे.

आयसिससाठी काम करणार्‍यासाठी सेल स्थापन करुन त्याद्वारे भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून इसिसच्या विचारसरणीचा प्रचार करणे हे काम या गटाचे होते.
शस्त्रे गोळा करण्यासाठी निधी उभारण्यासाठी आणि हत्या घडवून आणण्याचे त्यांचे उद्दीष्ट असल्याचा आरोप दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.

 

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एनआयएच्या पथकाने सोमवारी कोंढव्यातील ताल्हा खान याच्या घरी छापे घालून इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि काही कागदपत्रे जप्त केल्याचे एनआयएच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Crime | National Investigation Agency (NIA) raid in Kondhwa area of ​​Pune
Talha Liyaqat Khan Delhi Police Special Cell

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा