Pune Crime | NDPS गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी पुण्यातील (Pune Crime) भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. अनुराग अरुण पाटील Anurag Arun Patil (वय-19 रा. फ्लॅट नं. 101 भैरवनाथ अपार्टमेंट शेजारी, आंबेगाव बुद्रुक) असे जामीन मंजूर करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या जामिनाचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. मरे (Additional Sessions Judge A.N. Murray) यांनी जारी केल्याची माहिती ॲड. प्रसाद निकम (Adv. Prasad Nikam) यांनी दिली.

 

भारती विद्यापीठ पोलिसांनी कोकेन (Cocaine) बाळगल्याप्रकरणी आर्यन उर्फ लावण्य राजेंद्र पाटील (वय-20) आणि अनुराग अरुण पाटील (वय-19) यांच्याविरुद्ध एनडीपीएस ॲक्ट (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली होती. आरोपी अनुराग पाटील हा सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहे. त्याने ॲड. प्रसाद निकम यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने अनुराग पाटील याचा जामिन मंजूर केला. (Pune Crime)

आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी आर्यन उर्फ लावण्य पाटील हा अनुराग पाटील याच्या घरी दोन दिवसांसाठी राहण्यासाठी आला होता. तो पुण्यात शिक्षणासंबंधी माहिती घेण्यासाठी आला होता. पोलिसांना सापडलेला अंमली पदार्थ अनुरागच्या बॅगेत सापडला नसून लावण्य पाटील याच्या बॅगेत सापडला आहे. त्यामुळे याचा अनुराग पाटील याच्याशी काहीही संबंध नाही. तसेच आरोपीचे वय लहान असुन तो सध्या शिक्षण घेत आहे. त्यामुळे अनुराग पाटील याचा जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद वकिलांनी केला.

 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपीचा जामीन मंजूर केला आहे. आरोपीला प्रत्येक रविवारी सकाळी 10 ते 1 या वेळेत पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. ॲड. प्रसाद निकम यांना कामकाजामध्ये ॲड. तन्मय देव (Adv. Tanmay Dev), ॲड. अरुणा अंगरखे (Adv. Aruna Angarkhe) आणि ॲड. मन्सूर तांबोळी (Adv. Mansoor Tamboli) यांनी मदत केली.

 

Web Title :- Pune Crime | NDPS grants bail to accused

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा