Pune Crime | अचानक पिस्तुलातून उडाली गोळी ! कोल्हापूरच्या जयसिंगपूरमधील तरुण गंभीर जखमी; पुण्याच्या वारजे माळवाडी मधील घटना, पिस्तूलासह 15 जिवंत काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपल्या मुलीला भेटून ते परत जात होते. कारमध्ये बसताना त्यांच्या हातातील बॅग पडली आणि त्यातील परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळी उडाली. ती नेमकी बरोबर असलेल्या चुलत भावाच्या हातात घुसली. वारजे माळवाडी (Warje Malwadi News) येथील हैदराबाद बिर्याणी (Hyderabad Biryani) समोर शनिवारी दुपारी अडीच वाजता हा प्रकार घडला. (Pune Crime)

 

कोमलकुमार पाटील Komalkumar Patil (वय ३२, रा. जयसिंगपूर, कोल्हापूर – jaysingpur kolhapur) असे या घटनेत जखमी झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप पाटील Dilip Patil – jaysingpur kolhapur (वय ५०) आणि त्यांचा चुलत भाऊ कोमलकुमार पाटील (वय ३२) हे दोघे त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी बालेवाडी (Balewadi News) येथे आले होते. तेथून ते परत घरी जात होते. वाटेत ते वारजे माळवाडी येथील हैदराबाद बिर्याणी येथे थांबले होते. तेथून दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास परत आपल्या गावी जाण्यास निघाले. पाटील यांच्याकडील बॅगेत परवाना असलेले पिस्तुल होते. ते बोलेरो महिद्र या गाडीत चढत असताना त्यांच्या हातातील हँड बॅग रस्त्यावर पडली आणि त्यातील पिस्तुलातून अचानक गोळी उडाली.

 

ती त्यांच्याबरोबर असलेल्या कोमलकुमार यांच्या डाव्या हातात घुसली (Pune Crime).
त्यांना तातडीने रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.
त्याची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे. हॉस्पिटलकडून याबाबतची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी धाव घेतली.
तेथील हॉटेल व्यावसायिक व इतरांकडे चौकशी केली. निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी गोळी उडाली ते पिस्तुल, १५ जिवंत काडतुसे व रिकामे कार्टेज जप्त केले आहे.

 

घटनास्थळी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील अधिकारी तसेच ACP सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांनी भेट दिली.

 

Web Title :- Pune Crime | Negligent fire from licensed pistol komalkumar Patil from Jaysingpur, kolhapur injured warje malwadi police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mhada Exams Paper Leak | पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई ! ‘म्हाडा’चा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक, परिक्षा पुढे ढकलली