Pune Crime | वकीलावर झालेल्या हल्ला प्रकरणात पुतण्याच निघाला मुख्य सुत्रधार, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अ‍ॅड. हनुमंत अंकुश टाकळकर (Adv. Hanumant Ankush Takalkar) यांच्यावर 26 जुलै रोजी रात्री 8.30 च्या सुमारास पाच ते सहा जणांनी हल्ला केला होता. चार ते पाच जणांच्या टोळक्याने टाकळकर यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण (Beating) करुन त्यांच्या चारचाकी गाडीची तोडफोड (Vandalism) केली होती. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Ranjangaon MIDC Police Station) अज्ञाताविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. टाकळकर यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात त्यांचा पुतण्याच (Nephew) मुख्य सुत्रधार असल्याचे (Pune Crime) तपासात निष्पन्न झाले.

 

याप्रकरणी पोलिसांनी हर्षल सुभाष कोहकडे (Harshal Subhash Kohde), प्रज्वल दत्तात्रय सातकर Prajwal Dattatraya Satkar (दोघे रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे), वैभव आप्पा टाकळकर (Vaibhav Appa Takalkar) व इतर चार आरोपींवर गुन्हा दाखल करुन हर्षल आणि प्रज्वल यांना 30 जुलै रोजी अटक (Arrest) केली. चौकशीत वैभव टाकळकर याने वकील चुलत्याला मारहाण करुन हातपाय मोडण्यासाठी आरोपींना 50 हजार रुपयांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे करीत आहेत. (Pune Crime)

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस (Pune Rural Police) अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite),
उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी (Sub Divisional Police Officer Yashwant Gawari)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे (Police Inspector Balwant Mandge),
पोलीस उप निरीक्षक सुहास रोकडे (PSI Suhas Rokade) पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, विजय शिंदे,
उमेश कुतवळ, विलास आंबेकर, अभिमान कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Nephew turned out to be the main facilitator in the case of attack on the lawyer, two arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sunil Raut | ‘संजय राऊतांच्या भोंग्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात’, सुनील राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्लाबोल

Money Laundering Case | मनी लॉन्ड्रिंग प्रकरण ; National Herald सहित 12 ठिकाणांवर ईडीचे छापे

 

Ayurvedic Remedies for stomach worms | पोटातील जंत झाल्याने त्रस्त आहात का, ट्राय करा हे आयुर्वेदिक उपाय