Pune Crime | सायबर चोरट्यांचा नवा फंडा, निवृत्त शास्त्रज्ञाला घातला लाखोंचा गंडा; पाषाण परिसरातील घटना
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वीज पुरवठा खंडीत (Power Outage) करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांकडून (Cyber Thieves) सर्वसामान्य नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार सुरु आहेत. मात्र आता सायबर चोरट्यांनी एका निवृत्त शास्त्रज्ञालाची (Retired Scientist) साडेतीन लाखांची आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी परराज्यातील दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.
याबाबत एका सेवानिवृत्त शास्त्रज्ञाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. तक्रारदार पाषाण परिसरात राहायला आहेत. या प्रकरणी सुमन हरिश्चंद्र पौल Suman Harishchandra Paul (वय 40,रा.पश्चिम बंगाल), नितूदेवी जयप्रकाश चौधरी Nitudevi Jayaprakash Chaudhary (रा. बिहार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता.
वीज बिल त्वरीत न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी बतावणी चोरट्यांनी केली होती.
चोरट्यांनी संदेशात मोबाइल क्रमांक दिला होता. सायबर चोरट्यांचा मोबाइल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला.
त्यानंतर चोरट्यांनी शास्त्रज्ञाचा बँक खात्याची (Bank Account) गोपनीय माहिती (Confidential Information) घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी 3 लाख 59 हजार रुपये लांबविले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) तक्रार अर्ज दिला.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण (Police Inspector Ankush Chintaman) तपास करत आहेत.
Web Title :- Pune Crime | New Fund of Cyber Thieves, Extorted Lakhs from Retired Scientist; Phenomena in the rock environment
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Accident | स्कूल बसमधून पडून मदतनीस महिलेचा मृत्यू, शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू