Pune Crime | पुण्यात नवविवाहित महिलेची आत्महत्या, पतीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सासरच्या जाचाला कंटाळून एका नवविवाहित महिलेने आत्महत्या (commit suicide) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना फुरसुंगी येथील सिद्धी ग्रीन सोसायटीमध्ये (Siddhi Green Society Fursungi) 31 ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar police) पती, सासरे, सासु, नणंद यांच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल करुन पतीला अटक (Arrest) केली आहे.

आरतीकुमारी सुनिलकुमार यादव (वय-21 रा. सिद्धी ग्रीन सोसायटी, रेल्वेगेटजवळ, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती सुनिलकुमार शंभुप्रसाद यादव याला अटक करण्यात आली आहे. तर सासरे लालभगवान राय उर्फ शंभुप्रसाद यादव, सासु ललिता देवी यादव, नणंद संगिताकुमारी यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत आरतीकुमारीचे काका राकेश कुमार मनोकामना राय (वय-45 रा. मु.पो. दरीहारा चतुर्भुज, बिहार) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.2) फिर्याद दिली आहे.

Crime News | नगर परिषदेचा निलंबित अधिकारी निघाला ‘कुबेर’; 3 फ्लॅट, महागड्या गाड्या, 12 तास सुरु होता छापा

पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे (PSI Ravindra Dhaware) यांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव कुटुंब हे मुळचे बिहारचे (Bihar) आहे. पती सुनिलकुमार हा पुण्यात एका कंपनीत कामाला असून त्यांचा 8 महिन्यापूर्वी आरतीकुमारी हिच्यासोबत विवाह (Marriage) झाला होता. लग्नानंतर सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी आरतीकुमारीचा छळ केला. तसेच तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. एवढेच नाही तर तिला उपाशी ठेवून तिचा मानसिक आणि शारिरीक त्रास दिला. सासरच्या छळाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या काकांनी दिलेल्या तक्रारीवरुन पती सुनिलकुमार याला अटक करण्यात आली आहे. मयत आरतीकुमारी हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली की दुसरे काही कारण आहे याचा तपास पोलीस करीत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune Crime | खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्याकडून गोळीबार, केक शॉपमध्ये केला चोरीचा प्रयत्न

JSPM Pune Recruitment 2021 | जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे विविध पदांसाठी भरती

Sidharth Shukla | सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचं कारण अस्पष्टच? मुंबई पोलीस म्हणाले…

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Newly Married woman commits suicide in Pune, husband arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update