Pune Crime News | सेलिब्रिटीच्या ओळखी सांगत 30 कोटींच्या फंडिंगचे आमिष दाखवून घातला दीड कोटीला गंडा; लोणीकंद पोलीस ठाण्यात FIR

पुणे : Pune Crime News | आपल्या मोठमोठ्या सेलिब्रिटीच्या ओळखी आहेत. कंपनीच्या प्रोजेक्टसाठी ३० कोटींचे फंडिंग करुन देतो, असे सांगून प्रोसेसच्या नावाखाली एका व्यावसायिकाला तब्बल दीड कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी वडगाव शेरी येथील एका ३८ वर्षाच्या व्यावसायिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४२/२३) दिली आहे.
त्यानुसार, पोलिसांनी राघवेंद्र एन (रा. अदानी वेस्टर्न हाईटस मनीषनगर, अंधेरी वेस्ट, मुंबई) याच्यावर गुन्हा (FIR)
दाखल केला आहे. हा प्रकार फेबुवारी ते डिसेबर २०२१ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची केसनंद येथे कंपनी आहे.
राघवेंद्र एन याने फिर्यादी यांना त्यांच्या मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत चांगले संबंध आहेत,
असे दाखवून व ओळख सांगितली. फिर्यादीच्या केसनंद येथील कंपनीच्या प्रोजेक्टसाठी ३० कोटी रुपयांचे फंडिंग
करुन देतो, असे सांगून फंडिंग प्रोसेससाठी फिर्यादीकडून वेळोवेळी दीड कोटी रुपये घेतले.
मात्र, प्रोजेक्टसाठी फंडिंग करुन दिले नाही. फिर्यादी यांनी दिलेल्या पैशांचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी
इतरत्र वापरुन फिर्यादीची फसवणूक (Fraud Case) केली. सहायक पोलीस निरीक्षक टापरे तपास करीत आहेत.

Web Title :-Pune Crime News | 1.5 Crore cheated by giving the identity of a celebrity to lure funding of 30 Crores; FIR in Lonikand Police Station