Pune Crime News | बंद पडलेला व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे घेऊन एक कोटीची फसवणूक; राम निरंजन डागा, संदीप डागासह महिलेविरूध्द गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | बंद पडलेला व्यवसाय सुरु करुन मशीन घेण्यासाठी पैसे लावल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एक कोटी रुपये घेऊन प्रत्यक्षात कारखान्याची जागाही लिलावाद्वारे विकून फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे़. (Pune Crime News)

याप्रकरणी धीरज शांतीलाल ओस्तवाल (वय ४६, रा. एरंडवणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३२/२३ दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राम निरंजन डागा (Ram Niranjan Daga) व संदीप राम निरंजन डागा (Sandeep Ram Niranjan Daga) याच्यासह एका महिलेविरूध्द गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार २५ मे ते १४ नोव्हेबर २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओस्तवाल यांचा फर्ग्युसन रोडवरील श्रीकृष्ण अपार्टमेंट येथे
व्यवसाय होता. तो काही कारणाने बंद पडला होता.
आरोपींनी त्यांना बंद पडलेला व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच मशीन्स घेण्यासाठी पैसे लावल्यास व्यवसाय सुरु होईल तसेच त्यातून उत्तम परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यांच्याबरोबर करार केला.
फिर्यादी यांच्याकडून १ कोटी ८ लाख ५३ हजार १३९ रुपये घेतले.
प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणताही व्यवसाय सुरु केला नाही (Fraud Case).
फिर्यादी यांनी पैसे गुंतविलेला कारखाना फिर्यादीस अंधारात ठेवून लिलावाद्वारे परस्पर दुसर्‍यास विकला.
तसेच फिर्यादी यांनी खरेदी केलेली मशिन्स फिर्यादी यांना परत न करता ती बळकाविली.
पैशांचा अपहार करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | 1 crore fraud by taking money to start a defunct business; Crime against women including Ram Niranjan Daga, Sandeep Daga

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यातील ”त्या” पोस्टरने खळबळ; भाजपच्या गोटात वाढली चिंता

Satara Crime News | साताऱ्यातील ‘त्या’ खुनातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश; दापोलीमधून आरोपींना अटक

Pune Crime News | स्त्रीधन, पोटगी म्हणून मिळालेली रक्कम लांबवली; मुलीने आपल्याच वडिल, भावाविरुद्ध दिली तक्रार