Pune : खडक आणि विश्रांतवाडी परिसरात चोरटयांकडून ATM मशीन तोडफोडीचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात चोरट्यांनी खडक अन विश्रांतवाडी एटीएम मशीन तोडफोड करत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. एकाला पोलीसांनी अटक केली.

विशाल संपत चंदनशिवे (वय १८, रा. प्रतिकनगर, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आकाश वाघमारे (वय ३०, रा. वाकड )यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी पोलिस रात्र गस्त घालत होते. यावेळी एलफिस्टन रोडवरील एका एटीएममध्ये विशाल तोडफोड करुन चोरीचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलाला पकडले आहे. विश्रांतवाडी येथे टिंगरेनगरमध्ये असलेल्या एटीएम मशीनची तोडफोड केली. बीट मार्शल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान नरळे करीत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like