Pune Crime News | नार्कोटिक्स विभागातून बोलत असल्याचे सांगून पुण्यातील युवकाची 10 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तुमच्या नावाने मुंबई येथून तैवान येथे पाठवत असलेल्या पार्सलमध्ये ड्रग्स (Drugs) सापडले आहे, असे भासवून क्रेडिट कार्डवर (Credit Card Loan) लोन घेण्यास भाग पाडून सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) 10 लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी पावणे दहा ते पावणे अकरा च्या दरम्यान ऑनलाईन घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत क्षितिज जगदिश चंद्र तिवारी (वय-36 रा. शेवाळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार 77162XXXXX मोबाईलधारक, स्काईप प्रोफाइल नाव असलेले स्काईप अकाउंट धारक, पंजाब नॅशनल बँकेचे खातेदार यांच्यावर आयपीसी 419, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाला अज्ञात व्यक्तीने 21 सप्टेंबर रोजी संपर्क साधला. नारकोटिक्स विभागातून बोलत असल्याचे सांगून, तशा प्रकारचा स्काईप प्रोफाइल नाव असलेले स्काईप अकाउंट धारक याने पोलिस असल्याची बतावणी केली. तसेच फिर्यादी यांच्या नावाने मुंबई ते तैवान पाठवण्यात आलेले पार्सल मुंबई विमानतळ येथे आले आहे. या पार्सलमध्ये ड्रग्स असल्याची खोटी बतावणी सायबर गुन्हेगाराने केली. (Pune Crime News)

सायबर गुन्हेगाराने फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलमध्ये Skype कॉलिंग अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यानंतर क्रेडिट कार्ड लोन घेण्यास भाग पाडून पैशाचा चेक तयार करायचा असल्याचा बहाणा केला.
आरोपीने फिर्यादी यांना त्याच्या बँक खात्यावर 10 लाख रुपये पाठवण्यास भाग पाडले.
फसवणूक झाल्याचे समजताच क्षितिज तिवारी यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सायबर पोलिसांनी हा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे (PI Vishwas Dagle) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | सर्वपक्षीय बैठकीवरून जरांगे संतापले, ”अजून किती वेळ द्यायचा, फडणवीसांनी चर्चेला यावे, मराठे संरक्षण देतील”

Maratha Reservation | पुण्यात अजित पवार आणि उदय सामंतांचे बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)