Pune Crime News | रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र देऊन 10 जणांना घातला 10 लाखांना गंडा; अभिषेक तांबे, योगेश माने, निलेश माने यांच्यावर FIR

पुणे : Pune Crime News | रेल्वे मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांना नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र (Fake Appointment Letter) देऊन तिघा जणांनी १० जणांना १० लाख रुपयांना गंडा (Fraud) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

या प्रकरणी एका ३९ वर्षाच्या तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिषेक विजय तांबे (रा. कात्रज), योगेश संतराम माने व निलेश् संतराम माने (रा. ताडीवाला रोड) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार १५ डिसेबर २०२२ ते २ फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत.
त्यांनी पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) येथील आर एम एस (रेल्वे मेल सर्व्हिस) मध्ये नोकरी लावतो,
असे आमिष दाखवले. तसेच आणखी कोणी असेल तर त्यांनाही नोकरी देतो, असे सांगितले.
त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांचे नातेवाईक व इतरांना सांगितले.
त्यांच्याकडून १० लाख ८१ हजार रुपये घेतले. त्यांना भारतीय रेलची मुद्रा असलेले बनावट नियुक्ती पत्र दिले.
अशा प्रकारे अनेकांना या टोळीने नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक (Cheating Case) केली आहे.

Web Title :- Pune Crime News | 10 lakhs cheated by 10 people by giving fake railway appointment letter; FIR against Abhishek Tambe, Yogesh Mane, Nilesh Mane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त माधव जगताप यांना धमकी

Kolhapur News | ट्रक उलटला अन ग्रामस्थांची गर्दी झाली; ‘मदती’ला नव्हे ‘लुटालुटी’ला