Pune Crime News | आयटी कंपन्यांना गाड्या न लावता 10 लाखांची फसवणूक, हडपसर परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दोन चार चाकी गाड्या करारानुसार आयटी कंपन्यांना (IT Companies) न लावता इतरत्र भाडेतत्वावर देऊन टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची (Tours and Travels Company)10 लाख 52 हजार रुपयांची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी (Pune Crime News) एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 सप्टेंबर 2018 ते 1 फेब्रुवारी 2023 या कालावधीत फुरसूंगी येथे घडला आहे.

याबाबत संदीप भानुदास कणसे Sandeep Bhanudas Kanse (वय-38 रा. संत गजानन महाराज नगर, दिघी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश भगवान राठोड Ramesh Bhagwan Rathore (वय-32 रा. त्रिवेनी नगर, फुरसूंगी) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुना टुर्स अँड ट्रॅव्हल्स रेंट ए कॅब इंडिया प्रा. लि. (Pune Tours & Travels Rent A Cab India Pvt. Ltd.) येथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
आरोपीने दोन चार चाकी गाड्या आयटी कंपन्यांना लावण्याचा करार फिर्यादी यांच्या कंपनीसोबत केला होता.
मात्र आरोपीने आयटी कंपन्यांना गाडी न लावता इतरत्र भाडेतत्वावर देऊन कंपनीला कोणतीही माहिती न देता आणि गाड्या कोठे आहेत,
हे सांगितले नाही. कंपनी याबाबत विचारणा केली असता आरोपीने उडवा उडवीची उत्तरे देऊन फिर्यादी यांच्या कंपनीची 10 लाख 52 हजार 711 रुपयांची फसवणूक केली.
याबाबत फिर्यादी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता.
तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी बुधवारी (दि.1) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात (API Thorat) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | 10 lakhs fraud to IT companies without installing cars, type in Hadapsar area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Municipal Corporation (PMC) | प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या गोळा करा अन् मिळवा आकर्षक बक्षीस, पुणे महापालिकेची अनोखी स्पर्धा

Pune PMPML News | पीएमपीएमएल कडून 10 नवीन बसमार्ग तर 4 बसमार्गांचा विस्तार

Yash Chopra | ‘या’ दिवशी होणार ‘The Romantics’ ही सीरिज प्रदर्शित; यश चोप्रांच्या आयुष्याला मिळणार उजाळा