Pune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची फसवणूक; बापलेकांना लोणी काळभोर पोलिसांनी पाकिस्तान सीमेवरून केले अटक

पुणे (Pune Crime News ) : पोलीसनामा ऑनलाइन – आकर्षक परताव्याच्या आमिषाने तसेच भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या बापलेकांना लोणी काळभोर पोलिसांनी पाकिस्तान सीमारेषेवरून अटक केली आहे. गेल्या 9 महिन्यापासून ते फरार होते.

Bank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील ‘या’ 2 मोठ्या बँकाचेही होणार खासगीकरण, कर्मचारी अन् ग्राहकांत संभ्रम

भरतकुमार चरणदास जोशी, दिपक भरत कुमार जोशी आणि हितेन भरत कुमार जोशी (रा. सहयोगनगर, कच्छ, राज्य. गुजरात) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी ज्ञानेश्वर नारायण काळभोर यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

Avinash Bhosle | ईडीकडून प्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची 40.34 कोटींची मालमत्ता जप्त

पुण्यातील हडपसर आणि लोणी काळभोर परिसरात या आरोपींनी 2013 ते 2019 या कालावधीत एल सी जोशी अँड कंपनी, हिरेन ट्रेडिंग कंपनी, श्री ओमकार ट्रेडर्स, दीपक टी सप्लायर्स या कंपनीत सात वर्षासाठी गुंतवणूक केल्यास आकर्षक रक्कम परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादीसह इतर अकरा जणांकडून पैसे घेतले होते.

Maratha Reservation | ‘सरकारने 21 दिवसांची मुदत मागितलीय, पण आम्ही 1 महिन्याचा कालावधी देतोय’ – खा. संभाजीराजे

त्यानंतर त्यांना कुठलाही परतावा न देता त्यांची फसवणूक केली होती.
काही लोकांकडून लिलावाच्या भिशीच्या नावाने पैसे घेऊन त्यांची देखील फसवणूक केली होती.
यात एकूण 3 कोटी 59 लाख 96 हजार रुपयांची फसवणूक झाली होती. गुन्हा दाखल होताच तिघेही फरार झाले होते.

pune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक विभाग प्रमुखपदी अजित देशमुख यांची नियुक्ती; निवडणुकीचे पडघम वाजू लागले, ‘घट’ बसला !

गेल्या नऊ महिन्यापासून पोलीस या तिघांचा शोध घेत होते. यादरम्यान त्यांचा शोध घेण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांचे एक पथक गुजरात येथे गेले होते. तत्पूर्वी गुजरातला हे पथक दोन वेळा तर मुंबई येथे एक वेळा जाऊन आले होते.

नवीन गाईडलाईन लागू होताच लसीकरण मोहिमेने पकडला वेग, पहिल्या दिवशीच दिले विक्रमी 69 लाखापेक्षा जास्त ‘डोस’

पण, आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागल्याने ते चकवा देऊन ते पळून गेले होते.
दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक बाबींचा अभ्यास करून गुजरात येथे जाऊन चकवा देणाऱ्या आरोपींना गुजरातच्या कच्छ येथील पाकिस्तान सीमारेषेजवळून ताब्यात घेत अटक केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

आरोपींकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

PF News | कोरोना काळात नोकरी गमावणार्‍या कर्मचार्‍यांचे PF चे योगदान मार्च 2022 पर्यंत देणार सरकार

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त कल्याण विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे, उपनिरीक्षक अमित गोरे, नितीन गायकवाड, गणेश सातपुते, श्रीनाथ जाधव, अजिंक्य जोजारे यांच्या पथकाने केली आहे.


ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime News | 11 citizens cheated to the tune of Rs 3 crore 59 lakh; Bapleka was arrested by the Loni Kalbhor police from the Pakistan border

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update