इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफार्मरची कॉईल चोरीला

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – फुरसुंगीत सिमेंट मिक्सर प्लांटजवळील इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफार्मरची 57 हजार रुपये किंमतीची तांब्याची कॉईल चोरुन नेल्याची घटना घडली आहे. 26 फेबु्रवारी रोजी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी नागेश फडतरे (वय 21, रा. कदमवाक वस्ती) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी परिसरातील भापकर मळ्यालगत सिमेंट मिक्सरचा प्लॉन्ट आहे. त्याठिकाणी इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफार्मरला असणारी 57 हजार रुपये किंमतीची 98 किलोची तांब्याची कॉईल चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी पोलीस हवालदार ढवळे अधिक तपास करीत आहेत.