पुण्यातील प्रभात रस्त्यावर महिलेची पर्स हिसकावली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डेक्कन परिसरातील प्रभात रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील बॅग दुचाकीस्वार चोरट्यानी जबरदस्तीने हिसकामारून चोरून नेल्याची घटना घडली.
याप्रकरणी एका जेष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या प्रभात रस्त्यावरील गल्ली 1 एकमध्ये राहतात. त्या सोमवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. त्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुढे आल्यानंतर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यात अडकवलेली पर्स जबरदस्तीने हिसकामारुन चोरून नेली. त्यात मोबाईल आणि 200 रुपये रोख रोख होते. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.