Pune Crime News | येरवडा भागातील सराईत गुन्हेगार अनिकेत उर्फ दत्ता साठे टोळीवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 14 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | येरवडा भागात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार अनिकेत उर्फ दत्ता साठे याच्यासह 6 साथीदारांच्या विरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी मोक्का (MCOCA) Mokka कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांनी आजपर्यंत 14 टोळ्यांवर (Pune Crime News) कारवाई केली आहे.

 

अनिकेत उर्फ दत्ता राजू साठे (वय 21 रा. मदर तेरेसा नगर, येरवडा), आदित्य सतीश घमरे (वय 19), रौनक उर्फ टक्या आजेश चव्हाण (वय 20), अभय चंद्रकांत जंगले (वय 21 सर्व रा. पर्णकुटी पायथा, येरवडा), अमन गणेश भिसे (वय 20), ऋतिक राजू साठे (वय 22), राजू कचरु साठे (वय 50, सर्व रा. येरवडा) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात राजू साठे याला अटक करण्यात आली असून त्याचे साथीदार पसार झाले आहेत. (Pune Crime News)

 

अनिकेत साठे आणि साथीदारांनी येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerwada Police Station) हद्दीत दहशत माजवण्याचे गुन्हे केले आहेत. त्यांच्या विरुद्ध खून (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दहशत माजवणे, तोडफोड असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नाही. त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

या टोळीवर येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कलमाचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior Police Inspector Balkrishna Kadam)
यांनी तयार करुन उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate)
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma) यांच्याकडे सादर केला.
अपर पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावाची पडताळणी केली.
त्यानंतर साठे आणि साथीदारांवर मोक्का कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.
पुढील तपास सहायक आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav) करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम,
पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम चक्रे (Police Inspector Crime Uttam Chakre),
उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे (PSI Kumar Warangule), अकुंश डोंबाळे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | 14th MCOCA Action by Commissioner of Police Ritesh Kumar on pune criminal, Aniket alias Dutta Sathe gang of Yerawada area booked under mokka

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhumi Pednekar | भूमीच्या ‘त्या’ लूकमुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले – ‘कोणीतरी हिला चांगला डिझाईनर द्या….’

Pune News | कैद्यांना नातेवाईकांशी महिन्यातून 3 वेळा बोलता येणार, कारागृह प्रशासनाचा निर्णय

Avadhoot Gupte | ‘या’ कारणासाठी ‘झेंडा’ चित्रपटानंतर स्वतः बाळासाहेबांनी अवधूत गुप्तेला केला होता फोन