Pune Crime News | मुंब्र्यातून 17 वर्षीय मुलीला पुण्यात आणलं, लॉजवर केले लैंगिक अत्याचार; समर्थ पोलिसांकडून आरोपीला हैदराबादमधून अटक

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मुंब्रा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पुण्यात आणत तिच्यावर लॉजवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. समर्थ पोलिसांनी या आरोपीला हैद्राबाद येथून अटक (Arrest) केली आहे. Pune Crime News | 17-year-old girl brought to Pune from Mumbra, doing wrong thing in lodge with her; Samarth police arrested the accused from Hyderabad

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

महंमद रुबान महंमद मसूद (वय 26,रा. हैद्राबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल आहे. समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक ज्योती कुठे यांनी माहिती दिली की, पीडित मुलगी मुंब्रा (Mumbra) येथील आहे. 5 दिवसांपूर्वी पीडित मुलगी घरातून बेपत्ता (Disappeared) झाली होती. तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. यामुळे तिच्या पालकांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) मिसिंगची तक्रार दिली होती.

यादरम्यान तिच्या पालकांनी आरोपीला फोन संपर्क साधला आणि मुलीबाबत विचारपूस केली. त्याने मुलीचा फोन आला होता. तिने सांगितले की ‘मै घरसे भाग की आयु हु, मै मरणे वाली हु, असे सांगितले आहे, अशी माहिती त्याने पीडित मुलीच्या पालकांना सांगितले. त्यावेळी पालकांनी त्याला मुलीकडे फोनच नाही तर ती तुम्हाला कसा फोन करेल असे विचारले. त्यावेळी तो चाचपडला आणि त्याने शोध घेऊन कळवतो असे म्हणत फोन कट केला. त्यानंतर तो मुलीला घेऊन तिच्या घरी गेला आणि तिला घरी सोडले. तसेच ती डोंबविली रेल्वे स्थानक येथे मिळाल्याचे सांगितले.

यानंतर आरोपीचे कपडे तिची पत्नी धुत असताना तिला खिशात पुण्यातील रास्ता पेठेतील एका लॉजची पावती मिळाली.
त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी याबाबत विचारपूस केली.
त्याबाबत त्याने काहीच सांगितले नाही. यानंतर त्यांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांना सांगितले.
त्यांनी रास्ता पेठेत असलेल्या लॉजवर खात्री केली.
त्यावेळी त्यांना पीडित मुलगी व आरोपी हे येथे राहिले होते.
तसेच यावेळी त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला असे समजले.
मात्र मुलीला कोणालाही काही सांगितले. तर जावे मारण्याची धमकी दिली होती.
यानंतर त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यांनी गुन्हा दाखल केला आणि तो समर्थ पोलिसांकडे वर्ग केला.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, फरासखाना विभाग, समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती कुटे (सोमवार पेठ पोलीस चौकी), सहाय्यक फौजदार अर्जुन दिवेकर, शांताराम तळपे, निलेश साबळे, निलेश किरवे, शुभम देसाई यांनी केली आहे.

Web Title :-  Pune Crime News | 17-year-old girl brought to Pune from Mumbra, doing wrong thing in lodge with her; Samarth police arrested the accused from Hyderabad

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MLA Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकरांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी नेत्याचं माकड झालंय’

Career in photography । फोटोग्राफीची आवड आहे? तर मग करिअर? जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार आता भाजपच्या रडारवर? थेट CBI चौकशीचा मांडणार ठराव