तरूणाला मारहाण करत रोकड लुटली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पिकअपमुळे दुचाकीची वायर तुटल्याचा बहाणाकरून तरुणाला मारहाण करत रोकड चोरून नेल्याची घटना खडकी परिसरात घडली. याप्रकरणी अनिकेत जाधव (वय २०, रा. रोपळे, ता. पंढरपूर. जिल्हा सोलापूर) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव रविवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास आपल्या पिकअपमधून भाऊ पाटील रस्त्याने येत होते. त्यावेळी बोपोडी येथील मैला पाणी शुद्धीकरण केंद्राजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितले. तुमच्या पिकअप मुळे दुचाकीची वायर तुटल्याने या तरुणांनी सांगितले. त्यावेळी फिर्यादी यांच्या बरोबर त्यांचा भाऊ आणि कामगार देखील होता.

पिकअप बाजूला घेतल्यानंतर या आरोपींनी त्यांच्याकडे लायसन्स ची मागणी केली. त्यावेळी त्यांना झेरॉक्स दाखविली असता, मूळ ड्रायव्हिंग लायसन्स कुठे आहे, अशी विचारणा करत या दुचाकी चालकांनी त्यांना मारहाण केली. तसेच यांच्याकडे असलेली ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like