पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुंबई येथून तुमच्या नावाने तैवान येथे पार्सल गेले, परंतु त्यात ड्रग्स (Drugs) सापडले आहे. तसेच तुमच्या बँक खात्यातून मनी लॉन्ड्रींग (Money Laundering) होत असल्याचे सांगून बँकेची सर्व माहिती घेऊन पुण्यातील पाषाण येथील एका ज्येष्ठ नागरिकाची 18 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याबाबत सतीश नारायण वैद्य (वय-61 रा. पाषाण सुस रोड, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9827645509 मोबाईल धारक, स्काईप आयडी धारक व पंजाब नॅशनल बँक धारकावर आयपीसी 170, 419, 420, 465, 467, 468, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2023 सकाळी साडे आठ ते साडे अकरा या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश वैद्य यांना 18 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई पोलिसांचा लोगो असलेला
‘मुंबई सायबर क्राईम ऑनलाईन कंप्लेंट’ (Mumbai Cyber Crime Online Complaint) असा प्रोफाईल नाव
असलेल्या स्काईप आयडी युजरने फेडेक्स कुरीयर कंपनीतून व पोलीस असल्याचे सांगितले. त्याने वैद्य यांना तुमच्या नावाने मुंबई येथून तैवान येथे एक पार्सल गेले आहे. त्यामध्ये ड्रग्स सापडले असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या बँक खात्यातून मनी लॉन्ड्रींग होत असून बँक खाते व्हेरिफाय करायचे असल्याचे सांगून 18 लाख 11 हजार रुपये ट्रानस्फर करायला सांगून फसवणूक केली. तक्रारदार यांनी याबाबत तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | धक्कादायक! पुण्यात 8 वर्षाच्या मुलीसोबत गैरवर्तन, अल्पवयीन मुलगा ताब्यात