सोसायटीत वादावादी करणार्‍यांना समजावण्यास गेलेल्या पोलिसांंशी हुज्जत

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – बिबवेवाडी परिसरात सोसायटीत किरकोळ वादातून गोंधळ घालून भांडण करणार्‍यांना समजावण्यास गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की केल्याची घटना घडली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळानिर्माण केल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

सुनिल चावदास बोरूले (वय 51, रा. बिबवेवाडी). रोहन सुनिल बोरूले (वय 20), शुभण अरूण पवार (वय 23), अमित रामकृष्ण पवार (वय 28), सुमित रामकृष्ण पवार (वय 29) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार विश्वनाथ शिंदे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरूले व पवार हे बिबवेवाडी येथील सन्मित्रा अपार्टमेंटमध्ये राहण्यास आहेत. त्यांच्यात किरकोळ कारणावरून सोसायटीच्या सार्वजनिक पॅसेजमध्ये वादावादी सुरू होती. या वादावादीमुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. याची माहिती मिळाल्याने बिबवेवाडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, त्यांचा वाद सोडविण्यासा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फिर्यादी शिंदे व त्यांच्यासोबत असणार्‍या कर्मचार्‍यांशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ केली. तसेच, धक्काबुक्की करत ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळानिर्माण केला. अधिक तपास सहायक निरीक्षक उसगावकर हे करत आहेत.