Pune Crime News | दुर्देवी ! तिला वाचवायला गेल्या अन् 2 सख्या बहिणींनी जीव गमावला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मंचर जवळील एकलहरे गावच्या हद्दीतील घोडनदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या 2 सख्या बहिणींचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरूवारी घडली आहे (Two Girls Death By Drowning). प्रिती शाम खंडागळे (17) आणि आरती शाम खंडागळे (18, रा. मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे खंडागळे कुटूंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. (Pune Crime News)
बर्थडे निमित्त आरती आणि प्रिती मुंबईहून एकलहरे गावी आल्या होत्या. बुधवारी रात्री बर्थडेचा प्रोग्राम झाला. सकाळी कपडे धुण्यासाठी 5 जणी घोडनदीच्या काठावर गेल्या होत्या. नवीन पुलाजवळ त्या कपडे धुत होत्या. 5 जणींपैकी एकीचा पाय घसरला आणि ती नदीच्या पाण्यात पडली. ती बुडत असल्याचे पाहिल्यानंतर आरती आणि प्रिती या दोघी तिला वाचवण्यासाठी पाण्यात गेल्या. खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या दोघी पाण्यात बुडाल्या. मात्र, पाय घसरून पाण्यात पडलेली 12 वर्षाची मुलगी वाचली आहे. आरती आणि प्रितीला वाचविण्यासाठी बाकी मुली पाण्यात उतरल्या पण त्यांच्या नाका-तोंडात पाणी जात असल्याने त्या परतल्या. (Pune Crime News)
काठावरील महिलांनी आरडा-ओरडा सुरू केला. काहीजणांनी तात्काळ नदीकाठी धाव घेतली आणि पाण्यात बुडालेल्या दोघींना बाहेर काढले.
त्यांना तात्काळ मंचर येथील उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी दोघींचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
Web Title : Pune Crime News | 2 girls drowned in Ghod river in Machanar Mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा