Pune Crime News | महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी २ लाखांची खंडणी मागणारे जाळ्यात; हॉटेल व्यावसायिकाला देत होते जीवे मारण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हॉटेलसमोरील ताडपत्रा शेडवर कारवाई करण्याची व जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन २ लाखांची खंडणी (Ransom) देण्याचा व तडजोडी अंती १ लाख रुपयांची खंडणी घेण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 ने अटक केली आहे. (Pune Crime News)

 

सुभाष अशोक सहजराव (वय ३५, रा. कुडजे) आणि बाळासाहेब हरीभाऊ लोणारे (वय ५८, रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी सुकेश शेखर शेट्टी (वय २९, रा. वारजे माळवाडी) यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 कडे तक्रार केली.

 

याबाबतची माहिती अशी, सुकेश शेट्टी यांचे माळवाडी येथे हॉटेल आहे.
त्यांनी हॉटेलच्या समोर ताडपत्रीची शेड उभारली आहे. ही शेड बेकायदा असून महापालिकेकडून त्यावर कारवाई करायला लावतो,
असे सांगून सुभाष सहजराव व बाळासाहेब लोणारे यांनी त्यांच्याकडे २ लाख रुपयांची मागणी केली.
सुरुवातीला त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांनी पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादी यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 कडे तक्रार केली. त्यानंतर तडजोडअंती त्यांनी १ लाख रुपये घेण्यास तयार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी खेळण्यातील एक लाख रुपयांच्या नोटांचे बंडल तयार केले.
शिवणे येथील दुधाने इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथे शनिवारी सायंकाळी सात वाजता ते नोटांचे बंडल घेऊन उभे होते.
त्यांच्याकडून पैसे घेण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे,
उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर,
सहाय्यक निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण,
पोलिस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, अनिल मेंगडे, राहुल उत्तरनगर, ईश्वर आंधळे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, पवन भोसले, किशोर बर्गे, प्रदिप गाडे, आशा कोळेकर, रूपाली कर्णवर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | 2 lakh extortion in net to avoid municipal action; They were threatening to kill the hotelier

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sai Tamhankar | मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आहे एवढ्या कोटींची मालकीण जाणून घेऊया तिच्याबद्दल

Rani Chatterjee | भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने ‘तो’ निर्णय घेतला मागे; लवकरच झळकणार ‘या’ मालिकेत

Latur Crime News | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल