पुणे : Pune Crime News | सेव्हन लव्हज चौकातील (Seven Loves Chowk) पुलाखाली थांबलेल्या दोघा गुंडांकडून पोलिसांनी २ पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली.
शुभम अनिल शिंदे Shubham Anil Shinde (वय २४, रा. महर्षीनगर) आणि सिद्धेश अशोक शिगवन Siddhesh Ashok Shigwan (वय १९, रा. गुलटेकडी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, हवालदार ठवरे, जाधव, ढावरे, चव्हाण हे गस्त घालत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शुभम शिंदे व सिद्धेश शिगवन हे सेव्हज लव्हज चौकात थांबले असून त्यांच्याकडे पिस्तुल आहे. या माहितीनुसार पोलीस सेव्हन लव्हज चौकात गेले. तेथे थांबलेल्या दोघांना ताब्यात घेतले. शुभम शिंदे याच्या झडती पिस्तुल व २ काडतुसे आणि सिद्धेश शिगवन यांच्याकडे एक पिस्तुल व एक काडतुस मिळून आले. दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Survase) तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा
Pune Solapur Highway | पुणे-सोलापूर महामार्गावर बर्निंग बसचा थरार..! (Video)
Keshavrao Bhosale Natyagruha Fire | कोल्हापूर नगरी हळहळली! केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक;
जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला घटना (Video)