Pune Crime News | बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यातील बँकेची 21 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बनावट कागदपत्रे (Fake Document) बँकेत सादर करुन एकाने बँकेकडून तब्बल 20 लाख 83 हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार बँक ऑफ बडोदा शाखा कर्वे नगर (Bank of Baroda Branch Karve Nagar) येथे ऑगस्ट 2023 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत अखिल सुभाष पिसाळ Akhil Subhash Pisal (रा. कोथरुड, पुणे) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन राहुल पाटील Rahul Patil (प्लॉट 302, शिव गोरक्ष हाईट, गायमुख आंबेगाव बुद्रुक, पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420, 465, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अखिल पिसाळ हे बँक ऑफ बडोदाच्या कर्वेनगर शाखेत शाखाधिकारी (Branch Officer) आहेत. आरोपी राहुल पाटील याने बँक ऑफ बडोदाच्या कर्वेनगर शाखेत बनावट कागदपत्रे सादर करुन ती खरी असल्याचे भासवले. या कागदपत्रांच्या आधारे पाटील याने बँकेतून 20 लाख 83 हजार रुपयांचे वाहन कर्ज (Car Loan) मंजुर करुन घेतले. तसेच काही दिवसांनी ते वाहन परस्पर विकून बँकेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण (PSI Ganesh Chavan) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये वाद, अश्लील मेसेज करुन तरुणीचा विनयभंग; पुण्यातील प्रकार

पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत केला बलात्कार; लष्करातील जवानावर FIR

नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)

मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त

सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणार्‍या जेम्स व्हिल शापुरजी हौसिंग प्रा.लि. कंपनीला एक लाख रुपयांचा दंड