Homeक्राईम स्टोरीलोहगाव स्मशानभूमीत नवजात अर्भक सापडले

लोहगाव स्मशानभूमीत नवजात अर्भक सापडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विमाननगर भागातील लोहगाव स्मशानभूमीजवळ नवजात एक अर्भक बेवारस अवस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली. आज दुपारी हा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक सुधाकर नाईक यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव स्मशानभुमीच्या परिसरात एका झाडाजवळ नवजात अर्भक बेवारस अवस्थेत पडल्याची माहिती पोलसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अर्भकला तातडीने रूग्णालयात दाखल केले. त्यानुसार नवजात अर्भकाच्या पालकत्वाची जबाबदारी न स्विकारता त्याला बेवारस अवस्थेत सोडून देणाऱ्या पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गिरी तपास करत आहेत.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News