Pune Crime News | गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टरकडे 25 लाखांची खंडणीची मागणी, 7 जणांवर FIR; पिंपरी चिंचवड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | घरातील महिलांचे अश्लील फोटो (Obscene Photos) आणि व्हिडिओ (Videos) व्हायरल करण्याची धमकी देऊन गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टरकडून पाच लाख रुपये खंडणी (Extortion) घेतली. त्यानंतर कोयत्याने हल्ला करुन पुन्हा 25 लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी सात जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार (Pune Crime News) 2 डिसेंबर 2022 ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत लक्ष्मी चौक हिंजवडी आणि भोसरी पी.एम.टी. ऑफिस समोर घडला आहे. (Pimpri Crime News)

अशोक सांगळे (Ashok Sangle), रुद्र चाटे (Rudra Chate) व त्यांचे इतर पाच साथीदार यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) आयपीसी 384, 385, 341, 427, 506, 143, 147, 148, 149 महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत एका 34 वर्षीय गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर यांनी मंगळवारी (दि.10) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर (Government Contractor) आहेत.
अशोक सांगळे याने कामावरुन कमी केले व पैसे दिले नाहित याचा राग मनात धरुन फिर्यादी यांना घरातील
महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (Viral) करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपये खंडणी घेतली.
त्यानंतर आरोपीने आणखी 25 लाख रुपयांची मागणी केली.
पैसे दिले नाहीतर जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill) अशोक सांगळे याने दिली.
तर रुद्र चाटे आणि त्याच्या इतर पाच साथीदारांनी भोसरी येथील पी.एम.टी. ऑफिस येथे फिर्यादी यांची गाडी
आडवून त्यांच्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | 25 lakh extortion demand from govt contractor, FIR against 7; Incidents in Pimpri Chinchwad area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bachchu Kadu | आमदारांच्या अपघाताची मालिका सुरुच, रस्ता ओलांडताना आमदार बच्चू कडूंचा अपघात; गंभीर जखमी

Pune Crime News | आजोबाच करत होते 11 वर्षाच्या नातीसोबत अश्लिल चाळे; शाळेतील गुड टच बॅड टच कार्यक्रमातून झाले उघड

Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागलमधील घरावर ईडीची छापेमारी