Pune : मध्यवस्तीत शस्त्रधारी टोळक्यानं दहशत माजवत केली वाहनांची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यवस्तीत शस्त्रधरी टोळक्याने दहशत माजवत वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घोरपडे पेठेत हा प्रकार घडला आहे.

केदार खंडागळे (वय १९, रा. घोरपडे पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केदार यांचा भाऊ अपुर्व उर्फ मोन्याची काही दिवसांपुर्वी आरोपींशी वाद झाले होते. त्या वादाच्या रागातून आरोपींनी पहाटे कोयता हातात घेउन केदारला दमदाटी करीत धमकाविले. त्याशिवाय परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी आठजणांच्या टोळक्याने कोयते, बांबू हवेत उंचावून आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागू नका, नाहीतर एकएकाला कापून टाकू असे म्हणत दहशत निर्माण केली. परिसरातील दोन चारचाकी व चार दुचाकींची तोडफोड करुन नुकसान केले. अधिक तपास उपनिरीक्षक गणेश माने हे करत आहेत.

You might also like